ICC Womens World Cup 2025 Trophy Launched In Mumbai : भारतीय महिला संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मुंबईतील वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात यासंदर्भात भाष्य केले आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि भारताचा वर्ल्ड चॅम्पियन युवराज सिंगच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यातील कार्यक्रमात हरमनप्रीत कोरनं यावेळी आम्ही कमी पडणार नाही, अशी हमी देणारे वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आतापर्यंत जमलं नाही ते करून दाखवू
वर्ल्ड कप स्पर्धा नेहमीच खास असते. देशाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. भारतीय संघाला अद्याप एकदाही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही, पण यावेळी आम्ही कमी पडणार नाही. आतापर्यंत जे घडलं नाही ते यावेळी करुन दाखवून, अशा आशयाच्या शब्दांत हरमनप्रीत कौरनं जेतेपद उंचाण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करू, असे म्हटले आहे.
Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी
नेमकं काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
महिला वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात हरमनप्रीत कौर म्हणाली की, "आम्ही ते मिथक मोडून काढत नवा इतिहास रचून भारतीयांना अपेक्षित कामगिरी करून दाखवण्यासाठीच मैदानात उतरू. वर्ल्ड कप नेहमीच खास असतो. मी नेहमीच देशासाठी खास कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असते. ज्या वेळी मी युवी भाईला पाहते त्यावेळी प्रेरणा मिळते." असे म्हणत तिने युवीच्या साक्षीनं वर्ल्ड कप जिंकण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधना आणि माजी कर्णधार मिताली राज देखील उपस्थितीत होती.
त्या जुन्या आठवणींनाही दिला उजाळा
इंग्लंड दौऱ्यावरील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ वर्ल्ड कप आधी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. १४ सप्टेंबरपासून होणारी ही मालिका आमच्यासाठी वर्ल्ड कपच्या दृष्टिने महत्त्वाची ठरेल, असेही हरमनप्रीत कौर म्हणाली आहे. यावेळी हरमनप्रीत कौरनं २०१७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या १७१ धावांची खेळीच्या आठवणीलाही उजाळा दिला. ती खेळी माझ्यासह महिला क्रिकेटमधील खास अन् अविस्मरणीय क्षण होता. आम्ही फायनल गमावली तरी मायदेशात आमचं स्वागत झालं, ही आठवण सांगायलाही ती विसरली नाही.