Join us

IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!

पाकिस्तान संघाचा टीम इंडियाविरुद्ध वनडेतील हा सलग १२ वा पराभव ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 22:58 IST

Open in App

India Women vs Pakistan Women, 6th Match : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाला ८८ धावांनी पराभूत केले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडियानं गुणतालिकेत अव्वलस्थानी कब्जा केला. पाकिस्तान संघाचा टीम इंडियाविरुद्ध वनडेतील हा सलग १२ वा पराभव ठरला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान समोर २४८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर आउट झाला.

आशिया कप स्पर्धेपासून सलग चौथ्या रविवारी भारत-पाक यांच्यातील लढत पाहायला मिळाली. आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने प्रत्येक रविवारी पाकिस्तानवर पराभवाचा वार केल्यावर चौथा रविवार हा हरमप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं गाजवला.    

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाकडून हरलीन देओलनं केलेल्या ४६ धावा वगळता कोणत्याही बॅटरला ४० धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. पण तरीही भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात २४७ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून डायना बेग हिने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. याशिवाय सादिया इक्बाल आणि पाक कर्णधार फातिमा साना हिने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Women's Cricket Team Dominates Pakistan in World Cup!

Web Summary : Harmanpreet Kaur's team crushed Pakistan by 88 runs in the Women's World Cup. India secured their second consecutive win and topped the standings. Pakistan suffered their 12th straight ODI defeat against India. India set a target of 248, which Pakistan failed to chase, getting all out for 159.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५