India Women vs Pakistan Women, 6th Match : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाला ८८ धावांनी पराभूत केले आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडियानं गुणतालिकेत गत वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वलस्थानी कब्जा केलाय. पाकिस्तान संघाचा टीम इंडियाविरुद्ध वनडेतील हा सलग १२ वा पराभव ठरला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान समोर २४८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं सलग चौथ्या संडेला ब्लॉकबस्टर शो...
आशिया कप स्पर्धेपासून सलग चौथ्या रविवारी भारत-पाक यांच्यातील लढत पाहायला मिळाली. आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मागील तीन रविवारी पाकिस्तानवर पराभवाचा वार केला. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात होण्याआधी दुबईच्या मैदानात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत करत टीम इंडियानं आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता चौथा रविवार हा हरमप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं गाजवल्याचे पाहायला मिळाले.
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
बॅटिंगमध्ये भारतीय संघाकडून फक्त हरलीन देओलनं गाठला ४० धावांचा टप्पा
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाकडून हरलीन देओलनं केलेल्या ४६ धावा वगळता कोणत्याही बॅटरला ४० धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. पण तरीही भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात २४७ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून डायना बेग हिने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. याशिवाय सादिया इक्बाल आणि पाक कर्णधार फातिमा साना हिने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
मॅचमध्ये एकमेव अर्धशतक पाकच्या ताफ्यातून आले, पण...
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सिद्रा अमिन हिने १०६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८१ धावांची खेळी केली. याशिवाय नतालिया परवेझनं ४६ चेंडूत केलेल्या ३३ धावा आणि सिद्रा नवाझनं केलेल्या १४ धावा वगळता अन्य एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय स्नेह राणानं दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
Web Title : भारतीय महिला क्रिकेट टीम ने वर्ल्ड कप में पाकिस्तान को हराया!
Web Summary : हरमनप्रीत कौर की टीम ने महिला विश्व कप में पाकिस्तान को 88 रनों से हराया। भारत ने लगातार दूसरी जीत हासिल की और तालिका में शीर्ष पर पहुंच गया। पाकिस्तान को भारत के खिलाफ लगातार 12वीं वनडे हार का सामना करना पड़ा। भारत ने 248 रनों का लक्ष्य रखा, जिसका पीछा करते हुए पाकिस्तान 159 रनों पर ढेर हो गया।
Web Title : Indian Women's Cricket Team Dominates Pakistan in World Cup!
Web Summary : Harmanpreet Kaur's team crushed Pakistan by 88 runs in the Women's World Cup. India secured their second consecutive win and topped the standings. Pakistan suffered their 12th straight ODI defeat against India. India set a target of 248, which Pakistan failed to chase, getting all out for 159.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.