Join us

आधी वर्ल्ड कप हिसकावला अन् आता ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मोठा धक्का दिला, वाचा सविस्तर

केपटाउन कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:51 IST

Open in App

ICC Rankings: केपटाउन कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव केला. या मैदानावर टीम इंडियाने यजमान संघाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले आहे. असे असतानाही टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान गाठले आहे. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रमवारीत देखील भारताला पराभूत केले. क्रमवारीतील भारताचे वर्चस्व संपवण्यात अखेर कांगारूंना यश आले. 

मागील वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. कसोटीत अजिंक्य राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ काही काळ अव्वल स्थानी होता. मात्र, भारताकडे अधिक गुण असल्याने टीम इंडिया टॉपवर होती, जी आता दुसऱ्या स्थानी आली आहे. 

भारताची घसरण आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. कांगारूंचे ११८ रेटिंग असून त्यांच्या खात्यात ३५३४ गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका अनिर्णित राहिल्याने भारताला एका रेटिंगचे नुकसान झाले. भारतीय संघाचे ३७४६ गुण आहेत पण ११७ रेटिंगसह घसरण झाली आहे. इतर संघांच्या क्रमवारीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

पहिले स्थान पुन्हा मिळवण्याची संधीऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत विजय मिळवून कांगारूंचा संघ आपले अव्वल स्थान मजबूत करू शकतो. त्याचबरोबर मायदेशात इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका