ICC T20I Rankings : आयसीसीच्या नव्या टी-२० क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे. भारताचा युवा स्फोटक बॅटर अभिषेक शर्मा आशिया कप स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अव्वलस्थानावर तर कायम आहेच. पण करिअरमधील सर्वोत्तम रेटिंगसह त्याने नवा इतिहास रचला आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या फिल सॉल्टनं मोठी मुसंडी मारलीये. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे नव्या क्रमवारीत घाट्यात असल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मानं साधला सर्वोच्च रेटिंगचा डाव
छोट्या फॉरमॅटमध्ये मोठी कामगिरी करून टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वनचा ताज मिरवणाऱ्या अभिषेक शर्मानं आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह धावा कुटल्याचे पाहायला मिळाले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह नवा इतिहास रचला आहे. तो ८८४ रेटिंगसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.
फिल सॉल्टचा दुसऱ्या क्रमांकावर कब्जा
इंग्लंडच्या ताफ्यातील फिल सॉल्ट याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध आक्रमक अंदाजात विक्रमी शतक झळकावले होते. या कामगिरीसह त्याने ८३८ रेटिंगसह टी-२० च्या फलंदाजांच्या क्रमावारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्यापाठोपाठ जोस बटलर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात ७९४ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.
टीम इंडिचा कॅप्टन सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्मा घाट्यात
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मानंही दमदार खेळी केली होती. पण बटलरनं मोठा धमाका केल्यामुळे भारतीय युवा बॅटर चौथ्या क्रमांकावर घसरलाय. त्याच्या खात्यात ७९२ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. ट्रॅविस हेड पाचव्या क्रमांकावर कायम असून श्रीलंकेच्या पथुम निसंकानं आशिया कप स्पर्धेतील बॅक टू बॅक अर्धशतकासह ७५१ रेटिंग पॉइंट्ससह सहाव्या स्थानावर झेप घेतलीये. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ७४७ रेटिंग पॉइंटसह सातव्या क्रमांकावर घसरलाय. सूर्यानंही पाकिस्तानविरुद्ध नाबाद ४७ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. टॉप १० मधील अन्य फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा टिम सिफर्ट, श्रीलंकेचा कुसल परेरा आणि टीम डेविड अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.