ICC T20 Rankings : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केल्याचा तिलक वर्माला आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत त्याने दोन स्थानांनी उंच उडी मारली आहे. त्याच्या रँकिंगमधील सुधारणेचा फटका इंग्लंडचा स्फोटक बॅटर जोस बटलर आणि पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान बसला आहे. याशिवाय भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर टॉप १० मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार लटकताना दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्मा अव्वलस्थानी कायम; तिलक वर्मा कितव्या स्थानी?
भारताचा स्फोटक युवा फलंदाज अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मोठी खेळी करू शकलेला नाही. सातत्यपूर्ण कामगिरीसह तो आपले अव्वलस्थान कायम ठेवून आहे. त्याच्या खात्यात ९०९ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. त्याच्यापाठोपाठ यादीत इंग्लंडच्या फिल सॉल्टचा नंबर लागतो. ८४९ रेटिंगसह तो दुसऱ्या स्थानी आहे. पथुम निसंका ७७९ रेटिंगसह तिसऱ्या तर ७७४ रेटिंगसह तिलक वर्मा चौथ्या स्थानावर आहे.
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
जोस बटलरसह पाकच्या साहिबजादा फरहानची घसरण
तिलक वर्मानं चौथ्या स्थानावर झेप घेतल्यावर इंग्लंडच्या जोस बटलरसह पाकिस्तान साहिबजादा फरहानला फटका बसला आहे. बटलर एका स्थानाच्या घसरणीसह ७७० रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. पाकचा साहिबजादा ७५२ रेटिंगसह सहाव्या क्रमांकवर आहे.
सर्यकुमार यादवसमोर आव्हान!
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. परिणामी तो आता ६६९ रेटिंगसह टी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात दमदार कामगिरी करून टॉप १० मधील आपले स्थान कायम ठेवण्याचे आव्हान भारतीय कर्णधारासमोर आहे. संघासाठी उपयुक्त खेळी करून वर्षाचा शेवट सूर्या गोड करणार का? ते पाहण्याजोगे असेल.