ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात

गोलंदाजी क्रमवारीतल हार्दिक पांड्यासह-कुलदीप यादव घाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:46 IST2026-03-25T16:42:46+5:302026-03-25T16:46:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC Rankings Update Suryakumar Yadav Rise Kuldeep Yadav Hardik Pandya Drop Spots | ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात

ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघासह अन्य प्रमुख संघातील खेळाडू IPL २०२६ स्पर्धेच्या १९ व्या हंगामाची तयारी करत आहेत. यादरम्यान आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत काही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MI च्या संघाकडून मैदानात उतरण्याआधी सूर्यकुमार यादवला क्रमवारीत फायदा झाला आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याला फटका बसला आहे. इथं एक नजर टाकुयात ICC टी-२० क्रमवारीत कोणते बदल झाले आहेत त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अभिषेक शर्मा अव्वल! आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये कोण कोणत्या स्थानी?

आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत अभिषेक शर्मा अजूनही ८७५ रेटिंगसह अव्वलस्थानी कायम आहे. त्यापाठोपाठ ८७१ रेटिंगसह ईशान किशन दुसऱ्या स्थानावर आहे.  पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ८४८ रेटिंगसह या यादीत तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा फिल सॉल्ट (७९२ रेटिंग) आणि श्रीलंकेचा पथुम निसंका (७६६ रेटिंग) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. 

IPL मध्ये बाकावर बसून माफक पैसे कमावणारा क्रिकेटर झाला RCB चा सह मालक अन्...

सूर्याला मॅच न खेळता फायद्यात, तिलक वर्मापाठोपाठ लागतो नंबर

भारताचा मध्यफळीतील भरवशाचा युवा बॅटर तिलक वर्मा ICC टी-२० क्रमवारीत ७४२ रेटिंगसह ६ व्या स्थानावर असून सूर्यकुमार यादव दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता ७२२ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेत  टीम सिफर्ट संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत घसरण होऊन सामना न खेळताही सूर्याला फायदा झाला आहे.

गोलंदाजी क्रमवारीतल हार्दिक पांड्यासह-कुलदीप यादव घाट्यात

आयसीसीच्या गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीतल आघाडीच्या पाचमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राशीद खान ७५३ रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. पण हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला घाटा झाला आहे. कुलदीप यादव एका स्थानाच्या घसणीसह  ४२ व्या स्थानावर असून हार्दिक पांड्या दोन स्थानांच्या घाट्यासह ४८ व्या स्थानावर आहे.
 

Web Title: ICC Rankings Update Suryakumar Yadav Rise Kuldeep Yadav Hardik Pandya Drop Spots