Smriti Mandhana Loses No. 1 Spot Laura Wolvaard Top In Latest ICC Rankings : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मेगा फायनलनंतर आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. एका बाजूला नवी मुंबईचं मैदान गाजवत भारताच्या लेकी विश्वचषकाचा दागिना हातात घेऊन मिरवत असताना दुसऱ्या बाजूला स्मृती मानधनाला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या फायनलमधील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड मोकळ्या हाती न जाता ती भारताची वनडे क्वीन स्मृती मानधनाचा नंबर वनचा मुकूच घेऊन गेली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विश्वविक्रमी कामगिरीसह ती जाता जाता स्मृती मानधनाला धक्का देऊन गेली
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मानधनाची एका स्थानांनी घसरण झाली असून तिची जागा आता दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने घेतली आहे. सेमीफायनलसह फायनलमध्ये शतकी खेळी करून तिने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमावर विक्रम रचले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनलमध्ये शतक झळकवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. एवढेच नाही तर ५७१ धावांसह महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही तिने आपल्या नावे केला होता. या दमदार कामगिरीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ती पहिली ICC ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरली. पण जाता जाता तिने ICC क्रमवारीत अव्वलस्थान पटकावत स्मृती मानधनाला धक्का दिला आहे.
आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल
लॉरा अन् स्मृती यांच्यातील रेटिंगमध्ये फार अंतर नाही, पण...
आयसीसीच्या नव्या क्रमवारीत लॉरानं दोन स्थानांनी झेप घेत ८१४ रेटिंग पॉइंट्स मिळवत स्मृतीचा वनडे क्रमवारीतील नंबर वनचा ताज हिसकावून घेतला आहे. स्मृती मानधना ८११ रेटिंग पॉइंट्सह आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघींमध्ये रेटिंग पॉइंट्समध्ये फार अंतर नाही. वनडेतील एक डाव स्मृतीला पुन्हा नंबर वन करण्यास पुरेसा ठरेल. पण तुर्तास लॉराच नंबर वनच्या रुबाबात मिरवताना दिसेल. या दोघींपाठापाठ ऑस्ट्रेलियाची ॲशली गार्डनर ७३८ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.
जेमिमा रॉड्रिग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री
भारतीय महिला संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये तिने नाबाद शतकी खेळीसह टीम इंडियाच्या फायनलच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला होता. या खेळीच्या जोरावर जेमिमानं आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत टॉप १० मध्ये एन्ट्री मारली आहे. जेमिमा ६५८ रेटिंग पॉइंट्ससह ९ स्थानानी उंच उडी मारून १० व्या क्रमांकावर पोहचली आहे. हरमनप्रीत कौरचा चार स्थांनी फायदा झाला असून ती ६३४ रेटिंगसह १४ व्या स्थानावर आहे.
Web Summary : Laura Wolvaardt surpassed Smriti Mandhana in ICC ODI rankings after the World Cup final. Wolvaardt's stellar performance, including centuries in the semi-final and final, propelled her to the top spot, while Jemimah Rodrigues entered the top ten.
Web Summary : विश्व कप फाइनल के बाद लौरा वोल्वाार्ड ने आईसीसी वनडे रैंकिंग में स्मृति मंधाना को पीछे छोड़ दिया। सेमीफाइनल और फाइनल में शतक सहित वोल्वाार्ड के शानदार प्रदर्शन ने उन्हें शीर्ष स्थान पर पहुंचा दिया, जबकि जेमिमा रोड्रिग्स शीर्ष दस में शामिल हो गईं।