आयपीएलचा थरार रंगला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मार्च २०२६ च्या 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मागील महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारताचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइझेन या तिघांमध्ये या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. याशिवाय महिला क्रिकेटर्समध्ये अमेलिया केर, ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या आयाबोंगा खाका या तिघी ICC च्या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू अन् बुमराह यांच्यात खरी स्पर्धा, कारण...
संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह या दोघांमध्ये ICC कडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी खरी स्पर्धा असेल. कारण टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्म भूमिका बजावली आहे. संजू सॅमसन याने लेट एन्ट्री मारून जबदस्त कामगिरीच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मालिकावीरचा पुरस्कार पटकवला होता.
IPL Unique Record : किंग कोहलीनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम; जाणून घ्या सविस्तर
कोण ठरेल भारी?
संजू सॅमसन याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील वेस्ट इंडिज विरुद्ध ९७ धावांच्या नाबाद खेळीसह संघाचा स्पर्धेतील प्रवास कायम ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानतंर इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने ८९ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्येही ८९ धावांची दमदार खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १४ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. फायनलमध्ये त्याने १५ धावा खर्च करत ४ विकेट्स घेत संघाला सलग दुसरी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइझेन याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ५० पेक्षा अधिकच्या सरासरीसह २०० धावा केल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्यासाठीच्या ICC पुरस्काराच्या शर्यतीत संजू आणि बुमराह यांच्यात तगडी फाईट पाहायला मिळेल. शेवटी हा पुरस्कार कोण पटकवणार ते पाहण्याजोगे असेल.