T20 World Cup 2026 : हट्ट महागात पडला! ICC नं बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवत स्कॉटलंडला दिली संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं यासंदर्भातील आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:32 IST2026-01-24T20:19:04+5:302026-01-24T20:32:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC Has Announced Scotland Will Replace Bangladesh At ICC Men’s T20 World Cup 2026 | T20 World Cup 2026 : हट्ट महागात पडला! ICC नं बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवत स्कॉटलंडला दिली संधी

T20 World Cup 2026 : हट्ट महागात पडला! ICC नं बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवत स्कॉटलंडला दिली संधी

ICC Announced Scotland Replace Bangladesh At ICC Men’s T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार देणारा बांगलादेशचा संघ अधिकृतरित्या ICC च्या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश संघाच्या जागी स्काँटलंडच्या संघाला संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं यासंदर्भातील आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ICC चा मोठा निर्णय, नवख्या संघाला दिली संधी


आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या संघाने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर या संघाच्या जागी स्कॉटलंड संघ स्पर्धेत सहभागी होईल. नियोजित वेळापत्रकानुसार,  बांगलादेशच्या जागी सी गटात संघाचा समावेश करण्यात आला आहे. या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे अन्य संघ आहेत. 

आयसीसीचा कठोर निर्णय; बांगलादेशबाबत नेमकं काय घडलं?

आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे की, स्पर्धेला फार कमी दिवस उरले असताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) मागण्या पूर्ण करणं शक्य नव्हते. त्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागला. भारतामध्ये नियोजित सामन्यांच्या आयोजनासंदर्भात बीसीबीने व्यक्त केलेल्या चिंतांवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने सविस्तर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ICC ने स्पष्ट केले आहे.

दीर्घकाळ चर्चा, BCB ला आश्वासनही दिले, पण...

निवेदनानुसार, तीन आठवड्यांहून अधिक काळ आयसीसी आणि बीसीबी यांच्यात या मुद्यावरुन चर्चा सुरु होती. बीसीबीने भारतीय मैदानात खेळण्यासाठी नकार देताना मांडलेल्या सर्व चिंतांचा आढावा घेण्यात आला. अंतर्गत आणि बाह्य तज्ज्ञांकडून स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन करून त्यावर सखोल विचार करण्यात आला. आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन (IBC) बोर्डासोबत झालेल्या चर्चांसह अनेक टप्प्यांत बीसीबीला ही आश्वासनं देण्यात आली होती.

ICC नं २४ तासांचा वेळ दिला,  BCB ने उत्तर नाही दिले, मग...

आयसीसीच्या मूल्यांकनानुसार, भारतामध्ये बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाला, अधिकाऱ्यांना किंवा चाहत्यांना कोणताही धोका नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. या निष्कर्षांवर विचार केल्यानंतर आयसीसीने ठरवलं की, सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करणं योग्य नाही. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पर्धेतील सहभागासंदर्भात आपला निर्णय कळवण्यासाठी  २४ तासांची मुदत देण्यात आली होती.  पण बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे आयसीसीने बदली संघाची (Replacement) घोषणा केली. 


टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत स्कॉटलंडच्या संघाचे वेळापत्रक

  • ७ फेब्रुवारी : वेस्ट इंडिजविरुद्ध - कोलकाता
  • ९ फेब्रुवारी : इटलीविरुद्ध - कोलकाता
  • १४ फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्ध  -कोलकाता
  • १७  फेब्रुवारी : नेपाळविरुद्ध - मुंबई 
     

Web Title : टी20 वर्ल्ड कप 2026: बांग्लादेश बाहर, बीसीबी के इनकार के बाद स्कॉटलैंड शामिल

Web Summary : भारत में खेलने से इनकार करने के बाद बांग्लादेश टी20 वर्ल्ड कप 2026 से बाहर हो गया है। स्कॉटलैंड ग्रुप सी में उनकी जगह लेगा, जिसमें इंग्लैंड, इटली, नेपाल और वेस्ट इंडीज शामिल हैं। आईसीसी ने फैसले की पुष्टि की।

Web Title : T20 World Cup 2026: Bangladesh Out, Scotland In After BCB Refusal

Web Summary : Bangladesh is out of the T20 World Cup 2026 after refusing to play in India. Scotland replaces them in Group C, joining England, Italy, Nepal, and West Indies. ICC confirmed the decision.