Join us

PAK vs HK: "काही टिप्स आम्हाला पण द्या", PAK vs HK सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांचा संवाद व्हायरल

आशिया चषकात आज पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यामध्ये सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 13:46 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) आज हॉंगकॉंग आणि पाकिस्तान (PAK vs HK) यांच्यात सामना होणार आहे. हॉंगकॉंगने आपल्या पहिल्या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली होती. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला. हॉंगकॉंगच्या संघाला सुपर-4 मध्ये प्रवेश करण्यासाठी अद्याप संधी आहे. मात्र त्यांच्यासमोर बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचे तगडे आव्हान असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची भेट घेतली आहे. दोन्ही कर्णधारांमध्ये काहीशी चर्चा झाली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निजाकत खान आणि बाबर आझम यांच्या संवादाचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निजाकत पाकिस्तानच्या बाबर आझमकडून काही टिप्स घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. "काही टिप्स आम्हाला पण द्या", असे निजकत खानने म्हणताच बाबर आझमने निजाकतला साजेशे उत्तर देताना स्वत:वर विश्वास ठेवण्यास सांगितले. 

पाकिस्तानी संघाचे वर्चस्व हॉंगकॉंग आणि पाकिस्तान पहिल्यांदाच टी-20 मध्ये आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 एकदिवसीय सामने झाले आहेत. मात्र हॉंगकॉंगला विजय मिळवण्यात एकदाही यश आले नाही. सध्या हॉंगकॉंगच्या संघात पाकिस्तानी वंशाचे एकूण 5 खेळाडू आहेत. 

...तर रविवारी पुन्हा एकदा रनसंग्राम३१ ऑगस्टला झालेल्या भारत-हाँगकाँग सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तसेच आज म्हणजेच २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग अशी लढत होणार आहे. आज देखील पाकिस्तानचा संघ हाँगकाँगवर मात करेल अशी अपेक्षा आहे आणि असे झाल्यास ४ सप्टेंबरला A1 व A2 म्हणजेच गटातील अव्वल दोन संघ ( India-Pakistan ) यांच्यात लढत होईल. अर्थात आज पाकिस्तानने विजय मिळवल्यास रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. तसेच भारत व पाकिस्तानच्या संघाचा फॉर्म पाहता दोन्ही संघ अंतिम फेरीतही एकमेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तानचे कडवे आव्हान Super 4 मध्ये या दोन्ही संघांसमोर असेल. ११ सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे.

 

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानबाबर आजमभारतटी-20 क्रिकेट
Open in App