"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

कीर्ती आझाद यांच्या  वक्तव्यावर काय म्हणाले गंभीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:12 IST2026-03-11T11:56:18+5:302026-03-11T12:12:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Gautam Gambhir Reply To Kiri Azad T20 World Cup 2026 Trophy Suryakumar Yadav Visit Temple With Team India Coach Sparked Controversy | "तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

भारतीय संघाने अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करत टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे  जेतेपद पटकावले. विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची ट्रॉफी उंचावल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान माजी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटरने ट्रॉफी मंदिरात का नेली? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी मंदिरात का नेली?

१९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाने विजयानंतर ट्रॉफी मंदिरात का नेली? असा सवाल उपस्थितीत केला आहे. फायनल जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, कोच गौतम गंभीर आणि ICC अध्यक्ष जय शाह यांनी अमहादाबाद स्थित हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घतले होते. यावर कीर्ती आझाद यांनी ट्रॉफी एका धर्माची नाही तर संपूर्ण देशाची आहे, म्हणत टीम इंडियावर निशाणा साधला.  यावर कोच गंभीर याने कीर्ती आझाद यांना सुनावले आहे.  

ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO)

कीर्ती आझाद यांच्या  वक्तव्यावर काय म्हणाले गंभीर?

  


एएनआय वृत्तसंस्थेच्या पॉडकास्ट शोमध्ये गौतम गंभीर यांनी माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि विद्यमान खासदार कीर्ती आझाद यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्यावरुन प्रश्न विचारण्यात आला  होता. यावर गौतम गंभीर म्हणाले की, 

हा प्रश्न उत्तर देण्यासारखा वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका पराभवानंतर खेळाडूंनी ज्या प्रकारच्या दबावाचा सामना केला ते लक्षात घ्यायला  हवे. आज तुम्ही अशा प्रकारचं विधान करत असाल, तर खरं तर तुम्ही स्वतःच्या खेळाडूंना आणि संघालाच कमी लेखत आहात. असं करणं योग्य नाही. 
 

कीर्ती आझाद यांच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत याआधी ईशान किशन यानेही याआधी ही गोष्ट चर्चा करण्याजोगी नाही, असे म्हटले होते. एवढेच नाही तर हरभजन सिंग यानेही कीर्ती आझाद यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला होता.
 

Web Title : गौतम गंभीर ने कीर्ति आज़ाद की मंदिर यात्रा आलोचना पर टीम इंडिया को सराहा।

Web Summary : गौतम गंभीर ने टी20 विश्व कप ट्रॉफी के साथ मंदिर जाने पर कीर्ति आज़ाद की आलोचना पर टीम इंडिया का बचाव किया। उन्होंने खिलाड़ियों पर दबाव को रेखांकित करते हुए आज़ाद के बयान को टीम के प्रयासों के प्रति अनुचित बताया।

Web Title : Gautam Gambhir slams Kirti Azad's criticism of Team India's temple visit.

Web Summary : Gautam Gambhir criticized Kirti Azad for questioning Team India's visit to a temple with the T20 World Cup trophy. He defended the team, emphasizing the pressure players face and deeming Azad's statement unfair to the team's efforts.