Gautam Gambhir Dedicates T20 World Cup Win To Rahul Dravid : सूर्यकुमार यादवचे नेतृत्व आणि गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवला. भारताने सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासह घरच्या मैदानात विजेतेपदाचा यशस्वी बचाव करण्याचा ऐतिहासिक डावही साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माझी जबाबदारी ड्रेसिंगरुमधील खेळाडूंप्रती
टीम इंडियाच्या या विजयासह गौतम गंभीर यांच्या नावेही खास विक्रमाची नोंद झाली आहे. खेळाडूच्या रुपात वनडे आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियन कोचच्या रुपात ते ओळखले जातील. या जेतेपदानंतर गंभीर म्हणाले की, "माझी जबाबदारी ड्रेसिंग रूममधील खेळाडूंप्रती आहे," असे सांगत त्यांनी बाहेरील मतांपेक्षा संघातील एकजूट आणि समन्वय अधिक महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
India Wins T20 WC 2026: कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार! टीम इंडियानं जगज्जेतेपदासह रचला इतिहास, न्यूझीलंड...
ट्रॉफी कोणाला समर्पित कराल? द्रविडच नाव घेत गंभीर म्हणाले....
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी गौतम गंभीर यांना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची ट्रॉफी कोणाला समर्पित कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडसह दोन दिग्गजांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights
नेमकं काय म्हणाले गंभीर?
"भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिल्याबद्दल ही ट्रॉफी मला राहुल द्रविड यांना समर्पित करायची आहे. तसेच सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पडद्यामागे अप्रतिम काम केल्याबद्दल व्हीव्ही एस लक्ष्मण यांनाही याचं श्रेय द्यायला हवं. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांना बरीच टीका सहन करावी लागली, पण ते प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिले, त्यांचंही मी आभार मानतो. आणि शेवटी ‘जय भाई’ (आयसीसी अध्यक्ष जय शाह) यांचेही आभार मानतो. परिस्थिती माझ्या बाजूने नसतानाही त्यांनी मला कायम पाठिंबा दिला." असे भारतीय संघाचे प्रशिक्षक यांनी म्हटले आहे.