Gautam Gambhir And Shubman Gill Not Happy With Eden Gardens Pitch : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी कोलकाताच्या मैदानावर कुणाची जादू दिसणार? या चर्चेआधी खेळपट्टीवरून टीम इंडियाच्या ताफ्यात नाराजीचे वातावरण असल्याची गोष्ट समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर खेळपट्टी बघून झाला नाराज, गांगुलीची याउलट प्रतिक्रिया
एका बाजूला भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर खेळपट्टीवरुन नाराज आहेत. दुसऱ्या बाजूला बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुली यांनी मात्र खेळपट्टी उत्तम असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढती आधी दोन भारतीय दिग्गजांमध्ये अप्रत्यक्षरित्या सामना रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरुन कोच गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यात खूव वेळ चर्चा
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्या कसोटी मालिकेसाठी कोलकाता येथे पोहचले असून संघातील खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यासोबत खेळपट्टीवरून खूप वेळ चर्चा केली. यावेळी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल हे देखील उपस्थितीत होते. या वृत्तामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर छोटे गवत ठेवण्यात आले असून खेळपट्टी लाइट ब्राउन रंगाची दिसत आहे. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील यांच्यातील सामना शुक्रवारी सुरु होईल. त्यावेळीही यात फारसा बदल होणार नाही, असे चित्र दिसते.
खेळपट्टीसंदर्भातील प्रश्नावर गांगुलीनं दिलं असं उत्तर
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुली यांना ज्यावेळी खेळपट्टीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की, भारतीय संघाने आगामी कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असावी, अशी कोणतीही मागणी केलेली नाही. सध्याच्या घडीला ईडन्स गार्डन्सची खेळपट्टी अगदी उत्तम वाटते, असे गांगुलींनी म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीत या खेळपट्टीवर फिरकीच्या तुलनेत जलदगती गोलंदाजांना मदत मिळेल, अशी हिंट मिळते.
Web Summary : Gautam Gambhir expressed dissatisfaction with the Eden Gardens pitch for the India-South Africa test. Sourav Ganguly, however, stated the pitch is excellent, hinting at pace bowler assistance.
Web Summary : गौतम गंभीर ने भारत-दक्षिण अफ्रीका टेस्ट के लिए ईडन गार्डन्स की पिच पर असंतोष व्यक्त किया। सौरव गांगुली ने कहा कि पिच उत्कृष्ट है, जिससे तेज गेंदबाजों को मदद मिलेगी।