Dhruv Jurel On Gautam Gambhir : आशिया कप २०२५ स्पर्धेतील भारतीय टी-२० संघात विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांची वर्णी लागली आहे. परिणामी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेल्या ध्रुव जुरेलचा पत्ता कट झालाय. राखीव पाच खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव असले तरी दुबईचं तिकीट कन्फर्म होणं मुश्किलच वाटते. संघ निवडीसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असताना या प्रतिभावंत विकेट किपरनं कोच गंभीर यांच्यासंदर्भात मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोड बोलून संघाबाहेर काढल्याचा प्रकार
'ब्रेकिंग स्पोर्ट्स विथ विवेक सेठिया'सोबतच्या खास शोमध्ये ध्रुव जुरेल याने वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. नेहमी तुझ्या पाठीशी आहे, अशी हमी देणाऱ्या कोच गौतम गंभीरनं टी-२० साठी त्याच्यावर भरवसा दाखवलेला नाही. त्यामुळे गोड बोलून त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवलाय, अशी काहीशी चित्र त्याच्यासंदर्भात निर्माण झाल्याचे दिसते. पण युवा क्रिकेटरला तसं वाटत नाही. एका बाजूला गंभीरमुळे श्रेयस अय्यरचा पत्ता कट झालाय, अशी चर्चा रंगत असताना ध्रुव जुरेलनं गौतम गंभीरसंदर्भातही मोठं वक्तव्य केले आहे.
वर्ल्डकप २०११ फायनल सामन्यात धोनी फलंदाजीसाठी वर का आला? सचिननं सांगितली अंदर की बात!
कोच गंभीरसंदर्भात काय म्हणाला जुरेल?
भारतीय ड्रेसिंग रुममध्ये कोच गौतम गंभीर यांच्यासोबतचा सहवास हा प्रेरणादायी अन् उत्साह वाढवणारा आहे, असे तो म्हणाला आहे. गरज पडल्यास कोणत्याही वेळी कॉल करु शकतो, असे कोचने मला सांगितले आहे. मी तुला नेहमी सपोर्ट करेन, फक्त मेहनत करत राहा, असे ते मला म्हणाले आहेत, असे सांगत ध्रुव जुरेलनं कोचचे हे बोल आत्मविश्वास देणारे आहे, असे सांगितले.
गंभीरसंदर्भातील नकारात्मक चर्चेत सकारात्मक प्रतिक्रिया
भारतीय संघाच्या कोचिंगची सूत्रे गौतम गंभीर यांच्याकडे आल्यावर टीम इंडियात मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुभवी ऑलराउंडर रवीचंद्रन अश्विन याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून थांबण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाहीतर ऑस्ट्रेलियासह घरच्या मैदानातील कसोटी मालिकेतील पराभवामुळे खराब कामगिरीपेक्षाही ड्रेसिंग रुममधील गोष्टी लिक झाल्यासंदर्भात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. याच कारणामुळे सरफराज खानचा कसोटी संघातून पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली. त्यात आता श्रेयस अय्यरला संघाबाहेर ठेवण्यात गंभीरचा हात असल्याचे बोलले जात आहे. पण आता ध्रुव जुरेलनं कोच एक नंबर असल्याचे नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या कोचसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे दिसते.