Join us

आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?

हा दाखला देत करण्यात आलाय हा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:53 IST

Open in App

टीम इंडियातून बाहेर काढल्यावर मुंबईकर पठ्ठ्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात एन्ट्री मारली. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच त्याने त्याचं सोनं करून दाखवत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटाही उचलला. त्यानंतर IPL मध्ये कॅप्टन्सीची छाप सोडत बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्ज संघाला त्याने ११ वर्षांनी फायनलमध्ये नेलं. या प्रवासामुळे आशिया कपसाठी श्रेयस अय्यर टी-२० संघातही कमबॅक करणार हे निश्चित मानलं जात होते. पण BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी तो चांगली कामगिरी करतोय, हे मान्य करत कसोटी प्रमाणे टी-२० संघातही सध्याच्या घडीला त्याची जागा होत नाही, असे म्हणत श्रेयस अय्यरचा पत्ता कट केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आशिया कप स्पर्धेसाठी संघात मिळालं नाही स्थान; तो आता थेट कॅप्टन्सीचा दावेदार 

युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यर का नाही? हा प्रश्न चर्चेत असताना आता एक नवा दावा करण्यात येत आहे. श्रेयस अय्यरकडे बीसीसीआयच्या मनात मोठी गोष्ट घोळत असून रोहित शर्मानंतर तोच टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन होईल, असे बोलले जात आहे. आशिया कप स्पर्धेतील चूक टाळण्यासाठी BCCI नं ही पुडी सोडलीये, की खरंच असं काही घडणार? असा प्रश्न या दाव्यातून निर्माण होत आहे. इथं एक नजर टाकुयात कॅप्टन्सीसंदर्भात नेमकी काय दावा करण्यात आलाय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

हा दाखला देत करण्यात आलाय हा मोठा दावा

आशिया कप स्पर्धेसाठी पुन्हा एकदा शुबमन गिल उप कर्णधार झाल्यावर बीसीसीआय स्पिल्ट कॅप्टन्सीतून बाहेर पडत गिलच्या माध्यमातून तिन्ही संघाचा एक कॅप्टन या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा रंगू लागली होती. पण आता दैनिक जागरणने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत श्रेयस अय्यर हा वनडे संघाच्या नेतृत्वाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला खूप क्रिकेट होत असून तिन्ही प्रकारात एकच खेळाडू कॅप्टन्सी करणं शक्य नाही. श्रेयस अय्यला नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे वनडे संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्याचा विचार केला जाऊ शकतो. या प्रयोगामुळे शुबमन गिलला कसोटीवर फोकस करणं सोप होईल,  असा उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

टॅग्स :श्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2023