आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) शुक्रवारी दुबईत झालेल्या बैठकीत महिला विश्वचषकाचा विस्तार, ऑलिंपिकमधील क्रिकेटचा समावेश आणि मिताली राजचीआयसीसी महिला क्रिकेट समितीत झालेली नियुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भारतीय महिला संघाच्या रुपात यंदाच्या महिला विश्वचषक स्पर्धेत नवा विजेता मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२९ च्या आगामी हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होतील. २०२५ च्या हंगामात स्पर्धेला विक्रमी प्रेक्षकवर्ग मिळाल्यावर ही स्पर्धा अधिक रंगतदार करण्यासह महिला क्रिकेटचा अधिक विस्तार करण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतासह श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या स्पर्धेत विक्रमी प्रेक्षकवर्ग मिळाला अन्...
आयसीसीन एका निवेदनाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, महिला विश्वचषक स्पर्धेचं यश पुढे नेताना पुढील हंगामात या स्पर्धेतील संघांची संख्या ८ वरून १० करण्यावर आंतरारष्ट्रीय क्रिकेट सहमती दर्शवली आहे. यंदाच्या हंगामात या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते. २०२५ च्या विश्वचषक स्पर्धेत ३ लाख प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेतला. महिला विश्वचषक स्पर्धेतील ही विक्रमी संख्या ठरली. याशिवाय या स्पर्धेला जगभरातून विक्रमी ऑन-स्क्रीन प्रेक्षकसंख्या मिळाली आणि त्यात भारतातील प्रेक्षकांनी ५० कोटी प्रेक्षकांचा सहभाग होता, असा उल्लेखही या निवेदनात करण्यात आला आहे.
पॅन-अॅम आणि आफ्रिकन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश
२०२८ मध्ये क्रिकेट पुन्हा ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट होणार आहे. याशिवाय २०२७ मध्ये इजिप्त येथील काहिरो येथे नियोजित आफ्रिकन गेम्स आणि पेरु येथील लीमामध्ये पार पडणाऱ्या पॅन-अमेरिकन गेम्समध्येही क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे.
मिताली राजची आयसीसी महिला क्रिकेट समितीत
याशिवाय बैठकीत आयसीसीनं महिला क्रिकेट समितीतील नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. मिताली राज, ऍश्ले डी सिल्वा, अमोल मुजुमदार, बेन सायर, चार्लोट एडवर्ड्स आणि साला स्टेला सियाले वेया यांची या समितीत निवड करण्यात आली आहे.