Join us
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट

शुबमन गिलवर आगरकर-गंभीर मेहरबान,

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:28 IST

Open in App

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून भारतीय कसोटी संघातील नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता शुबमन गिल याच्या खांद्यावर टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. एवढेच नाही रिषभ पंत कसोटी संघातील उप कर्णधार झालाय. २० जून पासून इंग्लंड विरुद्ध रंगणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका शुबमन गिलसाठी आव्हानात्मक असेल. क्रिकेट चाहत्यांना नव्या कॅप्टनकडून निश्चितच मोठ्या अपेक्षा असतील. पण बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नव्या कॅप्टनवर कोणताही प्रकारचा दबाव किंवा अपेक्षेचे ओझे टाकलेले नाही. खुद्द शुबमन गिलने यावर भाष्य केले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नवी जबाबदारी, अपेक्षांचं ओझं अन् दबाव  

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियातील प्रिन्स आणि कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं स्काय स्पोर्ट्सवरील खास कार्यक्रमात माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत गप्पा गोष्टी केल्या. यावेळी त्याला कोच गौतम गंभीर आणि BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर गिलनं नवी जबादारी खांद्यावर पडल्याचा कोणताही दबाव नाही, असे म्हटले आहे.

इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?

नेमकं काय म्हणाला शुबमन गिल? शुबमन गिल म्हणाला की, नवी जबाबदारी मिळाल्यावर  मी गौती भाई  आणि आगरकर भाई यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवून दबाव निर्माण केलेला नाही. पण एक कर्णधार आणि खेळाडूच्या रुपात स्वत:कडून काही अपेक्षा निश्चितच बाळगून आहे, असे म्हणत आगामी दौऱ्यात खास छाप सोडण्यासाठी तयार असल्याचे गिल म्हणाला आहे.   

इंग्लंड दौऱ्याआधी २४ मे रोजी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधा झाल्याची घोषणा केली होती. तो भारतीय कसोटी संघाचा ३७ वा कर्णधार आहे.  इंग्लंडला रवाना होण्याआधी शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता गिलनं कोच किंवा निवडकर्त्यांकडून कोणताही दबाव नाही, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारतीय क्रिकेट संघशुभमन गिलअजित आगरकरगौतम गंभीर