मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये गोंधळ सुरू आहे. हिंदूंवर अत्याचार झाल्याचे समोर आले. दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केली, या प्रकरणावरून भारतात निदर्शने सुरू होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सना बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला संघातून सोडण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात सध्या बांगलादेशविरोधी भावना निर्माण होत आहेत, तिथे हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे, त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने रहमानला ९.२० कोटींना विकत घेतले. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतात त्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, अनेकांनी शाहरुख खानवर राष्ट्रीय हितसंबंधांना कमकुवत करण्याचा आरोप केला. यामुळे रहमानविरुद्ध निदर्शने झाली, यामुळे बीसीसीआयचा निर्णय झाला. बीसीसीआयच्या सचिवांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने पीटीआयने ही माहिती दिली.
रिप्लेसमेंट प्लेअर मिळणार
कोलकाता नाईट रायडर्सला रहमानची जागा घेण्याची परवानगी देण्यात येईल. देवजीत यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सना मुस्ताफिजुर रहमानला सोडण्यास सांगितले आहे. तो बदलीची विनंती करू शकतो. त्याच्या विनंतीनुसार, बीसीसीआय बदली खेळाडूला मान्यता देईल."