Join us

रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', नवीन पेहरावात टीम इंडिया

WTC final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:15 IST

Open in App

India Cricket Jersey | नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघ नव्या पेहरावात दिसणार आहे. अलीकडेच Adidas या किट निर्माता कंपनीने रोहित शर्मा आणि कंपनीसाठी नवीन जर्सी लॉंच केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघ देखील नवीन जर्सीत झळकणार आहे, याची पहिली झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. Nike नंतर प्रथमच टीम इंडियाच्या जर्सीवर स्पॉन्सर म्हणून प्रसिद्ध क्रीडा वस्तू निर्माता कंपनी दिसणार आहे. या नव्या जर्सीत भारतीय शिलेदार ७ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) Adidas कंपनीसोबत ५ वर्षांचा एक मोठा करार केला आहे, जो २०२८ पर्यंत चालेल. हा करार जवळपास ३५० कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. भारतीय पुरूष क्रिकेट संघ आणि महिलांचा संघ तिन्ही फॉरमॅटसाठी ही जर्सी परिधान करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. वन डे, ट्वेंटी-२० तसेच कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ वेगवेगळ्या जर्सीत असेल. 

नवीन जर्सीत भारतीय शिलेदार 

WTC फायनलसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

टॅग्स :बीसीसीआयजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघस्मृती मानधनाविराट कोहलीहरनमप्रीत कौररोहित शर्मा
Open in App