BCCI Annual Contracts Update : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक करारासंदर्भात (Annual Contracts) नवी प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या मॉडेलनुसार ग्रेड A+ कॅटेगरी रद्द केली जाण्याची शक्यता आहे. BCCI सूत्रांच्या माहितीनुसार, बोर्डाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास टीम इंडियाचे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे डिमोशन होऊ शकते. फक्त वनडे खेळत असल्यामुळे या दोघांना आगामी वार्षिक करारात ग्रेड-B मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI खेळाडूंच्या वार्षिक करारासंदर्भात मोठा निर्णय घेणार?
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय क्रिकेटर्सच्या वार्षिक करार प्रणातील मोठे बदल सुचवले आहेत. समितीने A+ कॅटेगरी (७ कोटी रुपये) रद्द करून फक्त तीन कॅटेगरी A, B आणि C ठेवण्याची शिफारस केली आहे. या नव्या प्रस्तावावर BCCI च्या एपेक्स कौन्सिल बैठकीत (वार्षिक सर्वसाधारण सभेत) अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
Virat Kohli: विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम; रिकी पॉन्टिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
रोहित शर्मा आणि विराट कोहली पगार कपात निश्चित!
NDTV च्या वृत्तानुसार, ही नवी प्रणाली लागू झाल्यास सध्या ग्रेड A+ मध्ये असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ग्रेड-B मध्ये स्थान दिले जाऊ शकते. या दोन्ही दिग्गजांनी टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे वार्षिक कराराच्या वेळी त्यांचा पगारही कमी होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. पण आता नव्या प्रणालीमुळे जसप्रीत बुमराहलाही पगार कपातीचा फटका बसेल. रोहित-विराटनंतर अन्य कोणी ग्रेड A+ मध्ये दिसणार नाही, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळतो?
BCCI च्या नियमानुसार, एका हंगामात ३ कसोटी किंवा ८ वनडे किंवा १० टी-२० सामने खेळलेल्या खेळाडूंना वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान मिळते. याआधी बीसीसीआयने हर्षित राणाला सवलत देत, भारतासाठी २ कसोटी, ५ वनडे आणि १ टी-२० सामने खेळल्यानंतर करारबद्ध खेळाडूंच्या यादी स्थान दिल्याचे पाहायला मिळाले होते.
बीसीसीआयच्या २०२४-२५ च्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत कुणाला किती पगार होता?
- ग्रेड A+ (४ खेळाडू): रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा (७ कोटी रुपयांचे पॅकेज)
- ग्रेड A (६ खेळाडू): मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत (५ कोटी रुपये)
- ग्रेड B (५ खेळाडू): सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर (३ कोटी रुपये)
- ग्रेड C (१९ खेळाडू): रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, सरफराज खान, आकाश दीप, नितीश रेड्डी, ध्रुव जुरेल, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन, अभिषेक शर्मा, हर्षित राणा (१ कोटी रुपये)