BCCI Announced India's Squad For 2026 ICC Men's T20 World Cup : भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत-श्रीलंकेतील मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेआधी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीस संघाची निवड करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ निवडीची घोषणा करण्यासाठी BCCI च्या मुंबईतील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या उपस्थितीत बीसीसीयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी संघाची घोषणा केली. शुभमन गिलचा पत्ता कट झाला असून अक्षर पटेलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय ईशान किशनलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार)
अक्षर पटेल (उप कर्णधार)
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक)
फलंदाज/ अष्टपैलू खेळाडू
- अभिषेक शर्मा
- तिलक वर्मा
- हार्दिक पांड्या
- शिवम दुबे
- रिंकू सिंह
गोलंदाज
- जसप्रीत बुमराह
- हर्षित राणा
- अर्शदीप सिंग
- कुलदीप यादव
- वरुण चक्रवर्ती
- वॉशिंग्टन सुंदर
- टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारतीय संघाचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध अमेरिका - ७ फेब्रुवारी, मुंबई
- भारत विरुद्ध नामिबिया - १३ फेब्रुवारी, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान - १५ फेब्रुवारी, कोलंबो
- भारत विरुद्ध नेदरलँड्स - १८ फेब्रुवारी, अहमदाबाद
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार ५ सामन्यांची टी-२० मालिका
- पहिला टी-२० सामना- २१ जानेवारी, नागपूर
- दुसरा टी-२० सामना - २३ जानेवारी, रायपूर
- तिसरा टी-२० सामना - २५ जानेवारी, गुवाहाटी
- चौथा टी-२० सामना - २८ जानेवारी, विशाखापट्टणम
- पाचवा टी-२० सामना - ३१ जानेवारी, तिरुवनंतपुरम