IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात पुरुष संघानं चाहत्यांना निराश केल्यावर दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघानंही तोच कित्ता गिरवलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:13 IST2024-12-08T14:10:34+5:302024-12-08T14:13:44+5:30

whatsapp join usJoin us
AUSW vs IND W 2nd ODI Smriti Mandhana Harmanpreet Kaur Flop Show Australia won by 10 wkts And seal an ODI series | IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडिलेडच्या मैदानातील कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष संघानं चाहत्यांना निराश केल्यावर दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघानंही तोच कित्ता गिरवलाय. परिणामी  एकाच दिवशी क्रिकेटच्या मैदानात टेस्ट आणि वनडेत टीम इंडियाचा फ्लॉप शो बघायला मिळाला. एका बाजूला कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार खेळाडूंच्या अपयशामुळे टीम इंडिया गोत्यात आली. दुसरीकडे महिला संघाला स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरच्या खराब कामगिरीनं अडचणीत आणले. 

ऑस्ट्रेलियासंघातील बॅटरच्या भातय्तून दोन सेंच्युरीसह अन् दोन फिफ्टी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियन महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यंदा बॅटिंग करताना मोठी धावसंख्या उभारली. सलामीची बॅटर जॉर्जिया वोल (Georgia Voll)हिने वनडेतील पहिली सेंच्युरी झळाकवली. तिने ८७ चेंडूत १०१ धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या बाजूला एलिस पेरी( Ellyse Perry) नं ७५  चेंडूत १०५ धावा करत भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. या दोघींशिवाय सलामीची बॅटर फीबी लिचफिल्ड (Phoebe Litchfield) ६०(६३) आणि विकेट किपर बॅटर  बेथ मूनी (Beth Mooney) ५६(४४) अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. दोन शतके आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघानं निर्धारित ५० षटकात धावफलकावर ३७१ धावा लावल्या होत्या. 

स्मृती मानधना अन् हरमनप्रीत कौरचा फ्लॉप शो

या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय स्टार बॅटर स्मृती मानधनाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ती पुन्हा एकदा अपयशी ठरली.  ८ चेंडूत ९ धावा करून ती तंबूत परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं थोडा वेळ मैदानात तग धरला. पण ४२ चेंडूत ३८ धावांची खेळी करून तिनेही पॅव्हेलियनचा रस्ता धरला. या दोघींच्या फ्लॉप शोममुळे भारतीय संघाला सामन्यात बाजी मारून मालिकेत बरोबरी साधण्याचा डाव साधता आला नाही. भारतीय संघाकडून सलामीला बॅटिंग करताना रिचा घोषनं ७२ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. ही संघाकडून एकमेव अर्धशतकी आणि सर्वोच्च खेळी ठरली. तिच्याशिवाय मिनू मनी हिने ४५ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.  भारतीय संघ पहिल्या वनडे प्रमाणे यावेळीही निर्धारित ५० षटके खेळू शकला नाही. ४४. ५ षटकातच भारतीय महिला संघाचा डाव २४९ धावांत आटोपला. या सामन्यासह भारतीय महिला संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही गमावली आहे.

Web Title: AUSW vs IND W 2nd ODI Smriti Mandhana Harmanpreet Kaur Flop Show Australia won by 10 wkts And seal an ODI series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.