Australia Women vs India Women, 3rd ODI : भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यासाठी पर्थच्या मैदानात उतरला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅप्टन हरमनप्रीतसह स्मृती मानधनाला पहिल्या दोन्ही सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. परिणामी भारतीय महिला संघाने ३ सामन्यांची मालिका गमावली. आता तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेचा शेवट गोड करण्यात तरी यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
अखेरच्या वनडेसाठी भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन
स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, तितास साधू.
तिसऱ्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेट कपिर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (c), सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट.
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यासाठी पर्थच्या मैदानात उतरला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅप्टन हरमनप्रीतसह स्मृती मानधनाला पहिल्या दोन्ही सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. परिणामी भारतीय महिला संघाने ३ सामन्यांची मालिका गमावली. आता तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेचा शेवट गोड करण्यात तरी यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
आगामी मालिकेच्या दृष्टीने खेळाडूंसाठी शेवटचा सामना ठरेल महत्त्वाचा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय महिला संघ घरच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. १५ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. एका बाजूला वेस्ट इंडिज महिला संघानं भारत दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पण भारतीय महिला संघाची अजूनही घोषणा झालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेनंतर आगामी मालिकेसाठी भारतीय संघ ठरेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना इम्प्रेस करण्यासाठी भारतीय महिला संघाच्या ताफ्यातील खेळाडूंसाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल.