Australia Women vs India Women, 1st ODI : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय महिला संघासमोर मोठं चॅलेंज; काय आहे संघाचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड
हरमनप्रीत ब्रिगेडसोर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आपला रेकॉर्ड उत्तम करुन मालिका जिंकण्याचं मोठं चॅलेंज आहे. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया आतापर्यंत १६ वनडे सामने खेळले आहेत. यात फक्त ४ सामन्यात भारतीय महिला संघाला विजय मिळाला आहे. भारतीय महिला संघानं या मालिकेआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय महिला संघानं १-२ अशा फरकाने मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार एलिसा हिली दुखापतीमुळे बाहेर असून तिच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर ताहलिया मॅकग्रा ऑस्ट्रेलियन महिला संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
टीम इंडिया या गोष्टीचा फायदा उठवणार का?
भारतीय महिला संघानं घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत २-१ असा विजय नोंदवला होता. या मालिकेतील विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या स्मृती मानधनावरही संघाची मोठी जबाबादीर असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात रंगणाऱ्या आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्नशील असेल. ऑस्ट्रेलियन संघ मागील ९ महिन्यांपासून एकही वनडे सामना खेळलेला नाही. याचा फायदा टीम इंडियाला होणार का? ते पाहण्याजोगे असेल.
भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन) :
प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेट किपर बॅटर), दीप्ती शर्मा, तीतास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग.
ऑस्ट्रेलिया महिला संघाची प्लेइंग इलेव्हन
फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेट किपर बॅटर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शट.
Web Title: Aus W vs Ind Women, 1st ODI: Harmanpreet Kaur wins the toss and elects to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.