ND vs AUS Gautam Gambhir Joined Indian Team Before Adelaide Pink Ball Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे. ६ डिसेंबरला रंगणाऱ्या या सामन्याआधी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. पर्थ कसोटी सामन्यानंतर गौतम गंभीर मायदेशी परतला होता. पण आता दुसऱ्या कसोटीआधी अॅडिलेडमध्ये पोहचला आहे.
कोच गौतम गंभीर अॅडिलेडमध्ये पोहचला
भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अॅडिलेडमध्ये आहे. पिंक बॉल कसोटीसाठी भारतीय संघ सराव करत असून गौतम गंभीरही सरावावेळी संघातील खेळाडूंसोबत हजर असेल. पर्थ कसोटी संपल्यावर तो वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला होता. ही किरकोळ रजा संपली असून तो टीम इंडियसोबत ऑन ड्युटीवर आल्याचे दिसते.
गौतम गंभीरशिवाय टीम इंडियाने खेळला होता सराव सामना
पर्थ कसोटीतील विजयानंतर भारतीय संघानं पिंक बॉल कसोटीसाठी मैदानात उतरण्याआधी ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळल्याचे पाहायला मिळाले. या सराव सामन्यावेळी गौतम गंभीर संघासोबत नव्हता. दोन दिवसीय सामन्यातील एक दिवस पावसाने वाया गेल्यामुळे फक्त एक दिवसाचा खेळ झाला. ज्यात बाजी मारत भारतीय संघाने अॅडिलेड कसोटीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
गौतम गंभीरसमोर चॅलेंज
अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगणारा सामना हा प्रकाश झोतात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासह कोच गंभीरसाठी हा कसोटीचा काळच असेल. पिंक बॉल चॅलेंज पार करून बाजी मारण्यासाठी परफेक्ट प्लेइंग इलेव्हन निवडताना गंभीर कुणला पसंती देणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची एन्ट्री फिक्स आहे. या दोघांच्या एन्ट्रीमुळे कुणाचा पत्ता कट होणार? अश्विन -जड्डूसंदर्भात कोच गंभीर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा असतील.