IND vs PAK, Asia Cup 2025 Live Streaming : आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील ६ व्या सामन्यात भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २०२४ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच हे दोन संघ पुन्हा एकदा समोरासमोर येतील. भारत-पाक यांच्यातील राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागल्यापासून आयसीसी अन् आशिया कप सारख्या बहुदेशीय/ मल्टीनेशन स्पर्धेतच हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसते. इथं एक नजर टाकुयात हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
INDIA vs PAKISTAN यांच्यातील मॅच कधी अन् कुठल्या मैदानात रंगणार?
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप स्पर्धेत 'अ' गटात आहेत. भारतीय संघाने UAE तर पाकिस्तान संघाने ओमान विरुद्धच्या लढतीनं या स्पर्धेत विजयी सलामी दिलीये. आता दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात दोन्ही संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ८ वाजता ही लढत सुरु होईल.
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
टेलिव्हिजनसह Live स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कुठं पाहता येईल हा सामना?
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत आहे. India vs Pakistan यांच्यातील लढतही सोनी स्पोर्ट्स टेलिव्हिजनवरच उपलब्ध असेल. ऑनलाइन Live स्ट्रीमिंगसाठी सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटच्या माध्यमातून मोबाइलवर ही हा सामना पाहता येईल. लोकमत.डॉट कॉमच्या माध्यमातूनही आम्ही सामन्यासंदर्भातील अपडेट्स देणार आहोत.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India Squad For Asia Cup 2025)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा,रिंकू सिंग.
आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ (Team India Squad For Asia Cup 2025)
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, हारिस राउफ, हसन अली, हसन नवाझ,हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान.