Asia Cup 2025, IND vs UAE 2nd Match Live Streaming And Head To Head Record : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील दुसरी लढत 'अ' गटातील भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिराती यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असल्यामुळे यूएईसाठी ही मॅच म्हणजे एक अग्नी परीक्षाच असेल. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा समोरासमोर येणार आहेत. इथं जाणून घेऊयातया सामना कुठं कधी अन् कसा पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं रंगणार हा सामना?
भारत आणि यूएई यांच्यातील सामना बुधवारी, १० सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ मैदानात उतरतील. साडे सात वाजता या सामन्याची नाणफेक होईल अन् कोणत्या संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार ते चित्र स्पष्ट होईल.
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
कुठं पाहता येईल Live मॅच?
भारतात IND vs UAE यांच्यातील सामन्याचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून होणार आहे. टेलिव्हिजनवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेत या सामन्याचा आनंद घेता येईल. आशिया कप स्पर्धेतील हिंदी कॉमेंट्री पॅनेलमध्ये वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, अजय जडेजा, विवेक राजदान, अभिषेक नायर, सबा करीम, गौरव कपूर, आतिश ठुकराल आणि समीर कोचर या मंडळींचा समावेश आहे.
ऑनलाइन Live स्ट्रीमिंग
सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटच्या माध्यमातून देखील क्रिकेट चाहत्यांना लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल. याशिवाय लोकमत.डॉट कॉमच्या माध्यमातूनही आम्ही तुम्हाला सामन्यासंदर्भातील अपडेट्स देणार आहोत.
IND vs UAE हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये फक्त एकमेव सामना खेळवण्यात आला आहे. २०१६ च्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने यूएईच्या संघाला ९ बाद ८१ धावांवर रोखत हा सामना ६१ चेंडूत ९ गडी राखून जिंकला होता.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उप कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
आशिया कप स्पर्धेसाठी UAE चा संघ :
मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, अर्यांश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, इथान डि सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्धीकी, मतिउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान.
Web Title: Asia Cup 2025: When and where can you watch IND vs UAE match? Know the record of both teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.