Asia Cup 2025 Team India Squad Tilak Varma vs Shubman Gill : आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाची वर्णी लागणार? याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलसाठी टीम इंडियाच्या ताफ्यातून तिलक वर्माचा पत्ता कट होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत होती. पण यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आलीये. शुबमन गिलसाठी युवा बॅटरवर अन्याय होईल, असा कोणताही निर्णय BCCI निवडकर्ते घेणार नाहीत, हे ठरलं आहे. त्यामुळे तिलक वर्मा हा आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियातील प्रमुख खेळाडू असेल, हे जवळपास निश्चित झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील कॅप्टन्सीत गिलला आजमावण्याचा विचार
इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून दिल्यावर आगामी काळात शुबमन गिल टीम इंडियाच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व करू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. याचाच भाग म्हणून आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलला संघात घेत त्याच्याकडे उप कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण शेवटी बीसीसीआयनं युवा बॅटरला पहिली पसंती देण्याचं ठरवलं आहे.
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
तिलक वर्मालाच मिळणार संधी, कारण...
शुबमन गिलला टी-२० संघात सेट करण्यासाठी अनेक पर्यायाचा विचार झाला. तिलक वर्माच्या जागी त्याला संघात घेण्याचा एक पर्यायही खुला होता. पण निवडकर्त्यांनी ICC टी २० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या युवा डावखुऱ्या बॅटरलाच पसंती दिलीये. तो टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला संघात स्थान न देणं म्हणजे त्याच्यावर अन्यायच होईल, हा विचार करून तिलक वर्मालाच संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसोटी मालिकेआधी विश्रांती
आशिया कप स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या संघात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी फिक्स आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल बॅकअप सलामीवीराच्या रुपात संघासोबत असेल. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळत नाही. त्यामुळेच त्याला संघात स्थान देऊन बाकावर बसवण्यापेक्षा BCCI निवड समितीनं ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटीसाठी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. १९ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड अपेक्षित असून याच वेळी अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब होईल.