Asia Cup 2025 Points Table : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील लढतीआधी स्पर्धेत सहभागी सर्व ८ संघांनी किमान एक सामना खेळला आहे. या स्पर्धेतील 'अ' गटात भारत-पाकिस्तानसह UAE अन् ओमान या चार संघाचा समावेश आहे. भारत-पाक हे दोन्ही संघ सुपर फोरमध्ये एन्ट्री मारणार हे फिक्स आहे. फक्त १४ सप्टेंबरला रंगणाऱ्या हायहोल्टेज लढतीनंतर या गटात टॉपर कोण राहणार ते चित्र एकदम स्पष्ट होईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकेनं धमाक्यात केली सुरुवात, पण...
भारत-पाक यांच्यातील लढतीआधी 'ब' गटातील श्रीलंकेच्या संघाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयासह यंदाच्या हंगामातील मोहिमेची एकदम धमाक्यात सुरुवात केलीये. पण या गटातील गुणतालिकेत मात्र अफगाणिस्तानची हवा दिसतीये. इथं एक नजर टाकुयात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्या लढतीनंतर आणि भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामन्याआधी कोणत्या गटातील कोणत्या संघासाठी सुपर ४ चा मार्ग कसा आहे? कुणासाठी वाजलीये धोक्याची घंटा यासंदर्भातील सविस्तर माहिती.
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
भारत-पाक सुपर फोरमध्ये खेळणार हे फिक्स; कारण...
आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सर्वात मोठा सामना हा १४ सप्टेंबरला रंगणार आहे. हे दोन्ही संघ सुपर फोरमध्ये खेळणार हे निश्चित आहे. कारण या गटात UAE अन् ओमान हे दोन अतिशय दुबळे संघ आहेत. ते साखळी फेरीत खेळूनच स्पर्धेबाहेर होतील. भारत-पाक यांच्यातील लढत ही दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेसह यंदाच्या हंगामातील जेतेपदाची दावेदारी भक्कम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल.
'अ' गटात कोणता संघ किती गुणासह कुठल्या स्थानी?
संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णीत (NR) | गुण | नेट रन रेट (NRR) |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | १ | १ | ० | ० | ० | २ | +१०.४८३ |
पाकिस्तान | १ | १ | ० | ० | ० | २ | +४.६५० |
ओमान | १ | ० | १ | ० | ० | ० | -४.६५० |
संयुक्त अरब अमिराती | १ | ० | १ | ० | ० | ० | -१०.४८३ |
श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तान भारी! या गटात आणखी एकदा होऊ शकते उलथापालथ
'ब' गटात अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ प्रत्येकी १-१ सामना खेळून अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंके विरुद्धच्या पराभवानंत बांगलादेश २ सामन्यातील एका पराभवासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांच्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 'करो वा मरो'ची लढत असेल. हा सामना १६ सप्टेंबरला रंगणार आहे. हाँगकाँगचा संघासोबत बांगलादेशवर स्पर्धेबाहेर होण्याची वेळ येणार की, इथं आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार ते पाहण्याजोगे असेल.
'ब' गटात कोणता संघ किती गुणासह कुठल्या स्थानी?
संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित (NR) | गुण | नेट रन रेट (NRR) |
---|---|---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तान | १ | १ | ० | ० | ० | २ | +४.७०० |
श्रीलंका | १ | १ | ० | ० | ० | २ | +२.५९५ |
बांगलादेश | २ | १ | १ | ० | ० | २ | -०.६५० |
हाँगकाँग | २ | ० | २ | ० | ० | ० | -२.८८९ |