Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

टीम इंडियानं आयसीसीच्या अकादमीमध्ये सुरु केला सराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:25 IST2025-09-06T12:13:02+5:302025-09-06T12:25:11+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Indian Team Reached Dubai And Begin Practice For The Tournament In ICC Academy Watch Video | Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Team Reached Dubai Practice For The Tournament In ICC Academy  : यूएईमध्ये ९ सप्टेंबर पासून रंगणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहचला आहे. या हंगामातील स्पर्धा ही टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार असून यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासह आशियाई संघांसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण असेल. भारतीय संघ यंंदाच्या हंंगामातील जेतेपदाचा प्रबळ दाववेदार मानला जात आहे. भारतीय संघात अनेक युवा चेहऱ्यांचा समावेश असून ते या स्पर्धेत कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टीम इंडियानं आयसीसीच्या अकादमीमध्ये सुरु केला सराव



भारतीय संघातील सर्वच्या सर्व १५ खेळाडू दुबईत पोहचले असून ५ सप्टेंबरला संघातील खेळाडूंनी आयसीसीच्या अकादमीत सरावही केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने फेब्रुवारीमध्ये अखेरची आंतरारष्ट्रीय टी-२० स्पर्धा खेळली होती. आशिया कप स्पर्धेतील संघातून जसप्रीत बुमराहही कमबॅक करतोय. तो २०२४ मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता. शुबमन गिलही वर्षभरानंतर पुन्हा एकदा टी-२० सामन्यासाठी सज्ज झालाय. 

 आशिया चषक स्पर्धेत दव ठरणार निर्णायक : गावसकर

सामन्यांच्या वेळेत बदल

आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामने यूएईच्या दुबई आणि अबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात  येणार आहेत. यूएईतील उष्ण वातावरणामुळे या स्पर्धेतील सायंकाळी साडे सातला सुरु होणारे सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत. भारतीय संघ १० सप्टेंबरला UAE विरुद्धच्या लढतीने आपल्या आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार असून १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना १९ सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळेल.

ओपनिंग जोडीचा तिढा सोडवण्याचं चॅलेंज

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार आहे. पण संघ निवडीसंदर्भात काही अंतर्गत गोष्टी टीम मॅनेजमेंटसाठी चॅलेजिंग असतील. यात ओपनिंग जोडीची निवड हा सर्वात महत्तत्वाचा मुद्दा असेल. अभिषेक वर्माच्या रुपात एक सलामीवीर फिक्स आहे. दुसरीकडे शुबमन गिलच्या कमबॅकमुळे संजू सॅमसन रिस्क झोनमध्ये आहे. आशिया कप स्पर्धेआधी केरळा क्रिकेट लीगमध्ये संजूनं ओपनिंगची आपली दावेदारी भक्कम केलीये. अभिषेक शर्मासोबत त्याला कायम ठेवून शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार होणार की, गिलला पहिली पसंती मिळणार? हा तिढा सोडण्याचे एक मोठे चॅलेंज संघ व्यवस्थापनासमोर असेल.  


 

 

Web Title: Asia Cup 2025 Indian Team Reached Dubai And Begin Practice For The Tournament In ICC Academy Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.