Team India Captan Suryakumar Yadav Did Not Bat He Slotted At No 11 Against Oman : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तगडी बॅटिंग लाइनअप असलेल्या आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८८ धावा करत यंदाच्या हंगामातील संयुक्तरित्या सर्वोच्च धावसंख्या उभारली. याआधी अफगाणिस्तानच्या संघाने हाँगकाँग विरुद्धच्या लढतीत याच मैदानात १८८ धावा केल्या होत्या. पण त्यांच्या तुलनेत टीम इंडियाने २ विकेट्स अधिक गमावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सगळ्यांना बॅटिंग मिळाली, पण...
विशेष म्हणजे संघाने ८ विकेट गमावल्या तरी सूर्यकुमार काही बॅटिंगला आला नाही. कुलदीप, अर्शदीप अन् हर्षिता राणाला बॅटिंग करताना बघून सूर्या बॅटिंगला यायलाही विसरला की काय? असा प्रश्न एखाद्या चाहत्याला पडू शकतो. कारण ओमान विरुद्धच्या सामन्यातील टॉस वेळी संघात दोन बदल झाल्याचे सांगताना सूर्यकुमार यादव कुणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलंय ते नाव विसरला होता. पण हे त्यामागचं कारण मुळीच नाही. ओमान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या कॅप्टनने सगळ्यांना बॅटिंग देणार हा पॅटर्न राबवल्यामुळेच एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले.
T20 Asia Cup Record : श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड; विराट टॉपला, पण...
प्लेइंग इलेव्हनमधील दोन बदलासह बॅटिंग ऑर्डरमध्येही नवा प्रयोग
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. रविवारी २१ सप्टेंबरला सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. या हायहोल्टेज लढती आधी ओमान संघाविरुद्ध टीम इंडियानने जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला विश्रांती देत अर्शदीप आणि हर्षित राणाला संधी दिली. एवढेच नाही तर सूर्याच्या सर्वांना बॅटिंग मिळणार या पॅटर्नमुळे त्यांनी बॅटिंगही केली. अभिषेक शर्मानं तोऱ्यात बॅटिंग करताना पुन्हा एकदा यासामन्यातही २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह १५ चेंडूत ३७ धावा कुटल्या. त्याच्याशिवाय आतापर्यंत बॅटिंगचा नंबर न आलेल्या संजू सॅमसन याने तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर अर्धशतकी डाव साधला. त्याने ४५ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. जी टीम इंडियाकडून ओमान विरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.
Web Title: Asia Cup 2025 INDIA vs OMAN Suryakumar Yadav Did Not Bat He Was Slotted At No 11Know Why
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.