Join us  

Asia Cup 2022:आशिया चषकापूर्वी पाकिस्तानला झटका; शाहीन आफ्रिदी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार? 

आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्ट पासून रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 5:41 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ झिम्बाब्वे (Indian Team) दौऱ्यासाठी शनिवारी मध्यरात्री रवाना झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. भारताचा झिम्बाब्वे दौरा होताच लगेचच आशिया चषकाचे बिगुल वाजणार आहे. २७ ऑगस्टपासून या बहुचर्चित स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध २८ तारखेला होणार आहे. मात्र या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 

भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार? 

दरम्यान, पाकिस्तानच्या संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. आफ्रिदीला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती, त्यामुळे तो खेळणार का यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. याच कारणामुळे तो श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलॅंडविरूद्ध मालिका खेळत आहे, त्यामुळे या मालिकेत आफ्रिदीला विश्रांती दिली जाऊ शकते.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसवर मोठी अपडेट दिली आहे. त्याने म्हटले की, शाहीन आफ्रिदीला नेदरलॅंडला नेले जाईल, जेणेकरून तो संघातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहू शकतो. तो तंदुरुस्त असल्यास नेदरलँडविरुद्ध देखील खेळू शकतो. आम्ही एक दीर्घकालीन योजना म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असल्याचे बाबरने अधिक म्हटले.  

आशिया चषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानभारतएशिया कपबाबर आजमभारतीय क्रिकेट संघझिम्बाब्वे
Open in App