WPL 2026 Mumbai Indians Amelia Kerr Most Expensive Overseas Player In History : वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2026) आगामी हंगामासाठी नवी दिल्ली येथे पहिल्या वहिल्या WPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या जुन्या खेळाडूंना पुन्हा ताफ्यात घेण्याचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. मेगा लिलावाआधी हरमनप्रीत कौरसह ५ खेळाडूंना आधीच रिटेन केलेल्या मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये ५ कोटी ७५ लाख रुपये होते. यातील निम्मी रक्कम त्यांनी न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिला पुन्हा संघात घेण्यासाठी खर्च केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
WPL मधील दुसरी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली अमेलिया
WPL मेगा लिलावात नीता अंबानी यांच्यासह आकाश अंबानी आणि संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही ऑक्शन टेबलवर दिसले. मार्की प्लेयरमधील गटात अमेलिया केरचं नाव येताच मुंबई इंडियन्सकडून नीता अंबानी यांनी तिला पुन्हा आपल्या संघात घेण्यासाठी पॅडल उचलले. पर्समध्ये सर्वाधिक पैसा घेऊन लिलावात उतरलेल्या यूपी वॉरियर्संनही अमेलियाला संघात घेण्यात रस दाखवला. पण मुंबई इंडियन्सने आश्चर्यकारक डाव खेळताना ३ कोटी रुपयांसह फायनल बाजी मारत अमेलियाला आपल्या संघात सामील करून घेतले. या रक्कमेसह अमेलिया WPL इतिहासातील दुसरी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली आहे.
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
गत हंगामात जिंकली होती पर्पल कॅप
पहिल्या तिन्ही हंगामात अमेलिया केर मुंबई इंडियन्सकडून खेळली होती. २९ सामन्यात तिने ४३७ धावा आणि ४० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. गत हंगामात सर्वाधिक १८ विकेट्स मिळत तिने पर्पल कॅप जिंकली होती. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाने तिच्यावर पुन्हा भरवसा दाखवला आहे. तिच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माइल हिला देखील MI नं ६० लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घतले आहे.