अंबाती रायडूची नवी इनिंग; CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी स्टार क्रिकेटर अंबती रायडू YSR काँग्रेसकडून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 06:40 PM2023-12-28T18:40:44+5:302023-12-28T18:41:52+5:30

whatsapp join usJoin us
Ambati Rayudu joins YSR Congress: Ambati Rayudu's new innings; Entry into YSR Congress in presence of Jagan Mohan Reddy | अंबाती रायडूची नवी इनिंग; CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश

अंबाती रायडूची नवी इनिंग; CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ambati Rayudu joinsed YSR Congress: भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू अंबाती रायडू (Ambati Rayudu) ची नवी इनिंग सुरू झाली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर रायडू आता राजकीय मैदान गाजवायला सज्ज झाला आहे. आज(दि.28) अंबाती रायडूने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत वायआरएस काँग्रेस (YSR Congress) पक्षात प्रवेश केला आहे.

अंबाती रायडूला फार कमी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सातत्याने डावलले गेल्यानंतर अखेर 37 वर्षीय रायडूने IPL 2023 नंतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रायुडू शेवटचा आयपीएल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळला होता. त्यानंतर आता रायडूने राजकारणात प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, या वर्षी जूनमध्ये रायडूने YSR काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. रायडूने आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जगन यांची इच्छा होती. आता रायडू लोकसभा निवडणूक लढवणार की, विधानसभा लढवणार, हे अद्याप समोर आले नाही. रायडूने लोकसभा निवडणूक लढवल्यास त्याला मछलीपट्टणममधून उमेदवारी दिली जाऊ शकते.

अंबाती रायुडूची कारकीर्द
अंबाती रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.05 च्या सरासरीने 1,694 धावा केल्या. नाबाद 124 धावा, ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय, रायुडूने 6 टी-20 सामन्यांमध्ये 10.50 च्या सरासरीने केवळ 42 धावा केल्या. याशिवाय रायुडूच्या नावावर 97 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6,151 धावा आहेत.

Web Title: Ambati Rayudu joins YSR Congress: Ambati Rayudu's new innings; Entry into YSR Congress in presence of Jagan Mohan Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.