T20I Tri-Series: अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात रंगणार फायनल! घरच्या मैदानात UAE च्या पदरी भोपळा

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे UAE चा संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:21 IST2025-09-06T13:19:41+5:302025-09-06T13:21:07+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan Defeated The United Arab Emirates By A Nail Biting Four Runs In T20 Tri Series Play Final Against Pakistan Ahed Of Asia Cup 2025 | T20I Tri-Series: अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात रंगणार फायनल! घरच्या मैदानात UAE च्या पदरी भोपळा

T20I Tri-Series: अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात रंगणार फायनल! घरच्या मैदानात UAE च्या पदरी भोपळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 Tri Series Afghanistan Beat United Arab Emirates And Play Final Against Pakistan :  इब्राहिम झादरान आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या UAE संघाला रंगतदार सामन्यात ४ धावांनी पराभूत केले. आशिया चषक स्पर्धेआधी UAE तिरंगी टी-२० मालिकेतील फायनलमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या मालिकेत यजमान यूएईच्या संघाने शेवटच्या साखळी सामन्यात पहिल्या विजयासाठी जोर लावला. पण शेवटी घरच्या मैदानात  त्यांच्या पदरी भापळाच पडला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

UAE च्या संघाने जोर लावला, पण...

तिरंगी टी-२० मालिकेतील शारजाच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या साखळी फेरीतील सहाव्या आणि अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यूएईच्या संघाने जोर लावला. पण त्यांना १६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

आशिया चषक स्पर्धेत दव ठरणार निर्णायक : गावसकर

आसिफ खानची फटकेबाजी ठरली व्यर्थ

अफगाणिस्तानच्या संघाकडून इब्राहिम झादरान याने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. याशिवाय गुरबाझनं ४० धावांचे योगदान दिले. आशिया कप स्पर्धेचा भाग असलेल्या यूएईच्या संघाकडून आसिफ खान याने २८ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून ४ चौकारांसह २ षटकार पाहायला मिळाले. पण त्याचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला. या मालिकेतील पहिल्या विजयापासून संघ दूरच राहिला.

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे UAE चा संघ

युएईचा संघ साखळी फेरीतील तीन सामने गमावल्यामुळे फायनलमधून आधीच बाहेर पडला होता. आशिया कप स्पर्धेत आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी अफगाणिस्तान विरुद्ध संघाने दमदार सुरुवात केली. १७१ धावांचा पाठलाग करताना अलिशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. नूर अहमदनं ही जोडी फोडली. अलिशान शराफू २३ चेंडूत २७ धावा करून तंबूत फिरला. अब्दुल्लाहअहमदझाई याने UAE च्या कर्णधाराला अर्धशतकापासून रोखलं अन् संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला. मुहम्मद वसीम याने २९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. आशिया कप स्पर्धेत UAE चा संघ टीम इंडियासोबत पहिला सामना खेळताना दिसेल.

Web Title: Afghanistan Defeated The United Arab Emirates By A Nail Biting Four Runs In T20 Tri Series Play Final Against Pakistan Ahed Of Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.