Join us  

युवराज सिंगच्या अडचणीत वाढ; 'त्या' विधानाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

रोहित शर्मावरही व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:43 PM

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहे. युवीनं काही दिवसांपूर्वी रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर चॅट करताना युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता एका दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.  

रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला 'भंगी' असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्ता आणि वकिल रजत काल्सन यांनी युवी विरोधात हिसार येथील हंसी येथे तक्रार दाखल केली आहे. असे वृत्त झी न्यूजने दिले आहे. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंड बुधवारी व्हायरल झाला होता. 

युवीविरोधात तक्रार दाखल करताना काल्सन यांनी रोहितवरही टीका केली. रोहितनं युवीच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करायला हवी होती, असं त्यांचं म्हणणं आहे. काल्सन यांनी युवीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांनी युवीच्या त्या वक्तव्याची CD आणि काही कागदपत्र पोलिसांना दिली आहेत. हंसीचे पोलिस अधिकारी लोकेंद्र सिंग यांनी सांगितले की,''याचा तपास सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. युवी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल.''

युवीनं 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं 304 वन डे, 40 कसोटी आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास 

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

Good News : 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारपासून सुरू होणार ट्वेंटी-20 स्पर्धा 

टॅग्स :युवराज सिंगगुन्हेगारीरोहित शर्मा