मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 12:21 PM2020-06-04T12:21:46+5:302020-06-04T12:22:36+5:30

Kerala Pregnant Elephant Death: या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

Man is not worthy of trust; Indian wrestlers outraged over killing of pregnant elephant | मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

googlenewsNext

भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं एका वसाहतीत गेली. पण, स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. केरळ येथील मलाप्पूरम येथे घडलेल्या या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले असले तरी हे कृत्य मानव जातीची मान शरमेनं झुकवणारं असल्याचे मत कुस्तीपटू गीता फोगाटनं व्यक्त केलं.

भारताची कुस्तीपटू गीता म्हणाली,'' मानव जातीच्या पापाचा घडा भरतोय. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.''


कुस्तीपटू योगेश्वर दत्त यानंही या घटनेचा निषेध व्यक्त केला.

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही. मानवाच्या छळाचं एक आणखी उदाहरण. मानव जातीचं अस्तित्व ढासळताना मी पाहत आहे. माणुसकी पुन्हा पराभूत झाली, असं मत कुस्तीपटू बजरंग पुनियानं व्यक्त केलं.

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनीही घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ''आपण रानटी आहोत. अजूनही आपण काहीच शिकलेलो नाही का? केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत जे घडले ते ऐकून मन हादरून गेले. कोणत्याही प्राण्याला इतकी निर्दयी वागणूक मिळायला नको, असे रोहित शर्मा म्हणाला.

''केरळमध्ये जे घडलं ते ऐकून मन अस्वस्थ झालं. प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि असे भ्याड कृत्य थांबवा, '' असे आवाहन विराट कोहलीनं केलं आहे. ''माणसांचे अजून एक लाजीरवाणे कृत्य... या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. हत्तीणीनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण तिची निर्दयीपणे हत्या केली,'' अशा शब्दात सुरेश रैनानं राग व्यक्त केला.  

फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,''ती गर्भवती होती, तिच्याकडून काहीच धोका नव्हता. लोकांनी जे केलं ते अमानवी कृत्य होतं आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. आपण पुन्हा पुन्हा निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. आपण स्वतःला विकसित प्रजाती कसं म्हणू शकतो?'' 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

Web Title: Man is not worthy of trust; Indian wrestlers outraged over killing of pregnant elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.