Good News : 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारपासून सुरू होणार ट्वेंटी-20 स्पर्धा 

कोरोना व्हायरसमुळे ब्रेक लागलेल्या क्रिकेट स्पर्धांना हळुहळू सुरुवात होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:27 PM2020-06-04T15:27:57+5:302020-06-04T15:28:24+5:30

whatsapp join usJoin us
It’s back! Australian cricket to resume on Saturday | Good News : 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारपासून सुरू होणार ट्वेंटी-20 स्पर्धा 

Good News : 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारपासून सुरू होणार ट्वेंटी-20 स्पर्धा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे ब्रेक लागलेल्या क्रिकेट स्पर्धांना हळुहळू सुरुवात होताना दिसत आहे. मागील महिन्यात कॅरेबियन बेटावर टी 10 लीगला सुरुवात झाली. त्यानंतर आता इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेची घोषणा झाली आहे. 8 जुलैपासून या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पण, अजूनही ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि भारतात होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) वर अनिश्चिततेचं सावट आहे. मात्र, आता ऑस्ट्रेलियात शनिवारपासून ट्वेंटी-20 लीगला सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही लीग पार पडणार आहे.

डार्विन प्रीमिअर ग्रेड क्लबमधील सात संघांसह एक निमंत्रित संघ अशा एकूण आठ संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लीगमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सामने मरारा क्रिकेट ग्राऊंड, गार्डन ओव्हलआणि कॅझली ओव्हल येथे सकाळी 10 व दुपारी 2.30 वाजता खेळवण्यात येतील.  MyCricket Facebook pageवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.  

''कोरोनाच्या संकटात आम्ही लीग आयोजित करून क्रिकेटचे स्वागत करू इच्छितो. मागील दोन-तीन महिने सर्वांसाठी आव्हानात्मक होते.  त्यामुळे क्रिकेटच्या पुनरागमनानं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,''असे एनटी क्रिकेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जोएल मॉरिसन यांनी सांगितले.   


या सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहा
6 जून - 10 वाजता. वराताह वि. नाईटक्लिफ; 2.30 वाजता. पिंट विरुद्ध निमंत्रित संघ
7 जून - 10 वाजता. साऊथ डिस्ट्रीक्ट वि. डार्विन; 2.30 वाजता पाल्मेर्स्टोन वि. ट्रॅसी व्हिलेज
8 जून -  10 वाजता. उपांत्य फेरी; 2.30 वाजता अंतिम सामना  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास 

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

Web Title: It’s back! Australian cricket to resume on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.