Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

बीसीसीआयला 4000 कोटींचा नुकसान सहन करावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 12:33 PM2020-06-04T12:33:42+5:302020-06-04T12:48:58+5:30

whatsapp join usJoin us
BCCI might consider shifting IPL 2020 out of India as last option | Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर येत नाही. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीतवर आणि सरकारच्या निर्णयावर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. त्यात देशातील परिस्थिती न सुधरल्यास आयपीएल परदेशात खेळवण्याचा विचार बीसीसीआयनं सुरू केला आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान सहन करावे लागेल.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी  Timesnownews.comला दिलेल्या मुलाखतीत हा विचार सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले,''खेळाडूंच्या सुरक्षिततेला कोणताच धोका नसेल, तर आयपीएल भारतातच खेळवण्यास आमचे प्राधान्य असेल. पण, परिस्थितीनं ही स्पर्धा आयोजनास परवानगी न दिल्यास, आमच्याकडे कोणताच पर्याय राहणार नाही. त्यामुळे स्पर्धा आयोजनासाठी विंडो उपलब्ध असल्यास स्पर्धा देशाबाहेर खेळवली जाऊ शकते.''

यापूर्वी 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिराती येथे झाले होते. ''आम्ही पूर्वी दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा खेळवली होती. आम्हाला परदेशात स्पर्धा खेळवायची नाही, परंतु हा एकमेव पर्याय आमच्यासमोर असेल, तर विचार करायला हरकत नाही,''असेही धुमाल यांनी सांगितले.

आयपीएल आयोजनासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ आणि संयुक्त अरब अमिराती यांनी बीसीसीआयकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे जर भारताबाहेर ही लीग खेळवण्याचा निर्णय झाल्यास या दोन देशांचा विचार नक्की होईल. पण, सद्यपरिस्थितीत खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. ते म्हणाले,''कोरोना व्हायरसचं संकट सर्व देशांमध्ये आले आहे. त्यामुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी अजूनही कायम आहे. श्रीलंका पर्याय आहे, पंरतु मागील काही दिवसांपूर्वी तेथील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे.'' 

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

Web Title: BCCI might consider shifting IPL 2020 out of India as last option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.