AB De Villiers On Shreyas Iyer :आशिया कप स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरची निवड न झाल्याची गोष्ट अनेकांना खटकलीये. सातत्याने दमदार कामगिरी करूनही त्याला संघात स्थान का नाही? गौतम गंभीरमुळे त्याचा पत्ता कट झाला असावा? असे अनेक प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहेत. यासंदर्भात आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स यानेही आपले मत व्यक्त केले आहे. पडद्यामागे काही तरी घडलंय अन् त्यामुळेच श्रेयस अय्यरच्या सिलेक्शनचं गणित बिघडलं, अशी शंका एबीच्या मनातही सतावताना दिसतीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंद दाराआड काय चाललंय त्याची कुणालाच काही कल्पना नाही
एबी डिव्हिलियर्स याने आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून श्रेयस अय्यरसंदर्भातील चर्चित मुद्यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, टीम इंडियात त्याला स्थान नाही हा निर्णय आश्चर्यचकित करुन सोडणारा आहे. आशिया कपसाठीच्या संघात निवड न झाल्यामुळे त्याला अधिक त्रास होत असेल. कारण मागील काही वर्षांपासून तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. तो एक परिपक्व खेळाडू आहे. त्याने नेतृत्व गुणही दाखवून दिलाय. पण बंद दाराआड नेमकं काय चाललंय ते ना आपल्याला माहितीये ना श्रेयस अय्यरला.
सिक्सर किंग युवीचा चेला पांड्या अन् सूर्या पेक्षा भारी! ९ चेंडूत एक षटकार मारतोच; इथं पाहा रेकॉर्ड
एक दिवस सत्य सर्वांमोर येईल
एबी पुढे म्हणालाय की, ज्यावेळी दोन खेळाडूंमध्ये एकाची निवड करण्यासंदर्भात निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी मी अशा खेळाडूला पसंती देईन, जो फिल्डबाहेर प्रभावी ठरेल. ड्रेसिंग रुममध्ये अन्य खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करून वातावण उत्तम करण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूला पसंती देणं योग्य पर्याय ठरेल, असे मला प्रामाणिकपणे वाटते. बंद दाराआड जे घडलं ते कदाचित एक दिवस सर्वांसमोर येईल. श्रेयस अय्यरला टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष का करावा लागला त्यामागचं सत्य आपल्याला कळेल, असेही एबी म्हणाला आहे. संघ निवडीनंतर अजित आगरकर यांनाही श्रेयस अय्यरला का संधी नाही यावर ठाम उत्तर देता आले नव्हते. त्यामुळेच या क्रिकेटरवर अन्याय झालाय, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.