महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामाला शुक्रवार, ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI W) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB W ) यांच्यात खेळवला जाणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल. इथं नजर टाकुयात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या संघातील सामना कधी आणि कुठं पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI vs RCB यांच्यातील लढतीनं होणार WPL च्या यंदाच्या हंगामाची सुरुवात
महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. MI संघ हा गत चॅम्पियन असून सलामीच्या लढतीत या संघासमोर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे आव्हान असेल. स्मृतीच्या नेतृत्वाखाली RCB नं २०२४ मध्ये जेतेपद पटकावले होते.
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
हेड-टू-हेड रेकॉर्ड
WPL मध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ७ सामने झाले आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या संघाने ४ तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ३ वेळा विजय मिळवला आहे. RCB संघ या स्पर्धेत विजयाच्या आकडेवारीची बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे MI संघ आपली आघाडी मजबूत करण्यावर जोर देईल.
WPL 2026 च्या हंगामातील MI vs RCB सामना कधी आणि कुठं रंगणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. अर्धा तास अगोदर हरमनप्रीत आणि स्मृती दोघी नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
MI vs RCB यांच्यातील सामना लाईव्ह टेलीकास्ट आणि स्ट्रीमिंगसंदर्भातील माहिती
हा सामना क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहायचा असेल तर JioHotstar अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंदी क्रिकेट चाहते घेऊ शकतात.
मुंबई इंडियन्स
हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर, जी. कमलिनी, अमेलिया केर, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजना सजीवन, राहिला फिरदौस, निकोला केरी, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, सायका इशाक, मिली इलिंगवर्थ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वोल, नादिन डी क्लर्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिन्से स्मिथ, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रथ्योषा कुमार, डी. हेमलता, सयाली सातघरे.