IPL 2020 MI vs CSK Latest News : ...तरीही सोशल मिडियावर इशान किशन ट्रेंडिंग, जाणून घ्या कारण

IPL 2020 MI vs CSK Latest News : स्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा दिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 10:19 PM2020-09-19T22:19:22+5:302020-09-19T22:19:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK Latest News: Ishan Kishan trending on social media, find out the reason | IPL 2020 MI vs CSK Latest News : ...तरीही सोशल मिडियावर इशान किशन ट्रेंडिंग, जाणून घ्या कारण

IPL 2020 MI vs CSK Latest News : ...तरीही सोशल मिडियावर इशान किशन ट्रेंडिंग, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा दिली नाही. त्याच्या ऐवजी सौरभ तिवारीला संघात स्थान देण्यात आले, असे असले तरी सोशल मिडियावर इशान किशनचीच चर्चा रंगली. मुंबईने इशान किशनला संधी न देता सौरभ तिवारी निवडले त्यामुळे नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले. इशानने या आधी गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पर्दापण केले होते. नंतर त्याला मुंबईने संघात घेतले.  

2019 च्या अंतिम सामन्यात त्यानेच धोनीला धावबाद केले होते. २२ वर्षांच्या आयपीएलमध्ये इशान किशन याने ३७ सामन्यात ६९५ धावा केल्या आहेत. त्याने अनेकवेळा शानदार खेळीने सामना देखील फिरवला आहे. मात्र त्या ऐवजी अनुभवी ३० वर्षांच्या सौरभ तिवारीला संधी देण्यात आली. त्याला न निवडल्याबद्दल नेटिझन्सनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर चांगलेच तोंडसुख घेतले.  पहिल्या सामन्यात चौथ्या स्थानावर आलेल्या सौरभ तिवारी याने मात्र अडचणीच्या वेळी  ३१ चेंडूत ४२ धावा काढत त्याची आपली निवड सार्थ ठरवली. तरीही इशान किशन हा स्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे या जागेवर तो योग्य राहिला असता,असे नेटिझन्सचे मत होते. 

मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; डू प्लेसिसचे झेल ठरले टर्निंग पॉईंट

मुंबई इंडियन्सचे Playing XI ( MI XI vs CSK XI)
क्विंटन डी'कॉक, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल चहर, जसप्रीत बुमराह

 फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

CSKचे Playing XI ( vs MI)
शेन वॉटसन, फॅब ड्यु प्लेसिस, सॅम कुरन, लुंगी एनगिडी, महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, दीपक चहर, पीयूष चावला. 

IPL 2020 Live Updates, Click here

IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

स्लीप ठेवायची की नाही? 
नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीनं निर्णय सांगण्यापूर्वी दोन सेकंदाचा कालवधी घेतला. त्याबाबत मुरली विजयनं त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला,''सोशल डिस्टन्सिंगच्या नव्या नियमात स्लीप ठेवू शकतो की नाही, हे मला त्यांना विचारायचे होते. ( धोनी हसला). मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. रात्री येथे दव प्रभाव टाकू शकतात.''   

महेंद्रसिंग धोनीला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून पत्नी साक्षीची रोमँटिक पोस्ट

दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News: Ishan Kishan trending on social media, find out the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.