IPL 2020 MI vs CSK Latest News : First time opener hit boundary in first ball of match, Rohit Sharma registered record | IPL 2020 MI vs CSK Latest News : IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

IPL 2020 MI vs CSK Latest News : IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं. इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. अबु धाबीच्या sheikh zayed stadiumवर हा सामना होत आहे.

महेंद्रसिंग धोनीला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून पत्नी साक्षीची रोमँटिक पोस्ट

पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. csk vs mi 2020

दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

रोहितनं केला विक्रम... 
चहरच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने  चौकार खेचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितचा हा चौकार विक्रमी ठरला. IPLच्या आतापर्यंतच्या 12 पर्वात एकदाही  पहिल्याच चेंडूवर चौकार किंवा षटकार लगावण्यात आलेला नाही. पहिल्या चेंडूवर चौकार मारणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरला.

- दीपक चहर सलग तीन आयपीएलमध्ये पहिले षटक टकणारा गोलंदाज ठरला. असा तो एकमेव गोलंदाज आहे.
- रोहित शर्माने तिसऱ्यांदा आयपीएलच्या सत्राची सर्वात पहिली धाव घेतली. याआधी  2015 व 2018 च्या आयपीएलची पहीली धाव त्यानेच घेतली होती.
- पहिल्या षटकात निघालेल्या 12 धावा ह्या आयपीएलच्या सलामी सामन्यात आतापर्यंत निघालेल्या सार्वाधिक धावा आहेत. याआधी 2013 च्या सलामी सामन्यात 9 धावा निघाल्या होत्या.
- आयपीएलच्या पहिल्याच षटकात 2013 नंतर दोन चौकार प्रथमच लागले.
- रोहित शर्मा लेगस्पिनविरुध्द 2017 पासून 120 चेंडूत 131 धावा. स्ट्राईक रेट 109 सरासरी फक्त 14.55

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News : First time opener hit boundary in first ball of match, Rohit Sharma registered record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.