India vs Sri Lanka Women 3rd T20I Live Streaming : ICC महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता टी-२० वर्ल्ड कपच्या मिशनवर आहे. घरच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेसह टीम इंडियाने आगामी मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या दोन टी-२० सामन्यातील विजयानंतर भारतीय महिला संघ आता तिरुवनंतपुरमच्या मैदानात तिसऱ्या टी-२० सामन्यात विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारत-श्रीलंका महिला संघातील तिसरा टी-२० सामना कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-श्रीलंका महिला संघातील तिसरा टी-२० सामना कधी आणि कोणत्या मैदानात रंगणार?
- सामना: भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी-२० सामना
- तारीख: शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५
- वेळ: सायंकाळी ७.०० वाजता
- नाणेफेक: सायंकाळी ६.३० वाजता
- सामन्याचे ठिकाण : ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
IND W vs SL W लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहाल?
भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघातील तिसरा टी-२० सामना JioHotstar अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रसारित करण्यात येणार आहे.
पहिल्या दोन सामन्यांत काय घडलं?
पहिल्या टी-२० सामन्यात जेमिमा रोड्रिग्सने नाबाद ६९ धावा करत भारताला सहज विजय मिळवून दिला होता. या सामन्यात गोलंदाजीत दीप्ती शर्माने उत्तम गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात फलंदाजीत शफाली वर्मा तर गोलंदाजीत वैष्णवी शर्मासह श्री चरणीनं सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली होती.
स्मृतीचा क्लास नाही दिसला!
भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना हिला पहिल्या दोन सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. पण या खेळीच मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात ती अपयशी ठरली. तिसऱ्या सामन्यात तिच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. याशिवाय या सामन्यात पुन्हा एकदा शफाली वर्मासह जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.