if yo yo test existed in our time sachin tendulkar sourav ganguly vvs laxman would never have passed it says virender sehwag | ...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

Virender Sehwag on YoYo Test: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विट्स आणि रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या क्रिकेटपटूंच्या फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. भारतीय संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो चाचणी द्यावी लागते. पण वीरेंद्र सेहवागनं फिटनेसच्या बाबतीत बीसीसीआयच्या कडक नियमांवर नाराज आहे. भारतीय संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणीत पास होणं बंधनकारक नसावं असं सेहवागचं म्हणणं आहे. आमच्या काळात तर यो-यो चाचणी असती तर त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांना जागा मिळवता आली नसती, असं सेहवागनं म्हटलं आहे. 

IPL 2021: चेन्नईत उतरलं 'स्पेसशिप'!, त्यातून निघालं खतरनाक अस्त्र; RCB चं धमाल ट्विट

नुकतंच काही युवा खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी चालून आली होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेआधी या खेळाडूंना यो-यो चाचणी द्यावी लागली आणि यात ते खेळाडू अपयशी ठरले. यात राहुल तेवतिया दुसऱ्या चाचणी उत्तीर्ण झाला. पण वरुण चक्रवर्ती दुसऱ्या चाचणीतही नापास ठरला. यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. सेहवागनं यो-यो चाचणीच्या याच मापदंडावर आक्षेप घेतला आहे. 
अनेक दिग्गज संघात दिसलेच नसते

KKRचा धाकड फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; गोव्यात सुट्टी पूर्ण करून झालेला संघात दाखल

"आपण यो-यो चाचणी बद्दल बोलतो. पण संघात हार्दिक पंड्याला गोलंदाजी करावी लागतेय त्यामुळे त्याच्यावरचा भार वाढतोय याचा विचार करायला हवा. दुसरीकडे आर.अश्विन आणि वरुण चक्रवर्ती यो-यो चाचणी पास न झाल्यानं संघाचा भाग नाहीत. या गोष्टीला माझी सहमती नाही. फिटनेसचे हेच मापदंड याआधी असते तर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएल लक्ष्मण आणि सौरव गांगुली देखील यो-यो चाचणी पास झाले नसते. मी त्यांना कधीच बीप टेस्ट पास झालेलं पाहिलं नाहीय. त्यांना नेहमी १२.५ अंकांपेक्षाही कमी गुण मिळायचे", असं सेहवाग म्हणाला. 

Wow; कोलकाता नाइट रायडर्सच्या महागड्या खेळाडूनं खरेदी केला ५४ कोटींचा बंगला!

"तुमच्या खेळातलं कसब महत्ववाचं आहे. आज तुम्ही खेळत आहात. पण तुमच्याकडे कौशल्य नसेल तर तुम्ही पराभूत होता. त्यामुळे कौशल्याच्या आधारावर सिलेक्शन व्हायला हवं. हळूहळू तुम्ही खेळाडूच्या फिटनेसच्या गोष्टी सुधारू शकता. पण थेट यो-यो चाचणी बंधनकारक करणं हे योग्य नाही. जर एखादा खेळाडू मैदानात १० षटकं टाकून क्षेत्ररक्षण देखील करू शकतो. तर त्यावर आपण समाधानी असायला हवं", असंही सेहवाग म्हणाला. 
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: if yo yo test existed in our time sachin tendulkar sourav ganguly vvs laxman would never have passed it says virender sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.