Wow; कोलकाता नाइट रायडर्सच्या महागड्या खेळाडूनं खरेदी केला ५४ कोटींचा बंगला!

Indian Premier League 2021 : आयपीलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Night Riders) संघाचा महागडा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं सिडनीत ५४ कोटींचा बंगला खरेदी केला आहे.

ऑस्ट्रेलियातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या कमिन्सनं नुकतंच गर्लफ्रेंड बेकी बॉस्टनसोबत साखरपुडा केला होता. आयपीएल २०२० लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनंवर KKRसंघानं १५.५ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला होता.

Figtree House असे त्या बंगल्याला नाव देण्यात आले असून त्यात पाच बेडरूम आहेत. दुसऱ्या मजल्यावरून समुद्राचा नजारा दिसतो. यूएईत झालेल्या आयपीएल २०२०त कमिन्सनं १४ सामन्यांत फक्त १२ विकेट्स घेतल्या होत्या.

कमिन्सला २०१९चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा मान मिळाला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियन संघाला अॅशेस मालिका कायम राखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. शिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांविरुद्धच्या कसोटी मालिका विजयातही कमिन्सनं महत्त्वाची भूमिका वटवली होती.

कमिन्सने २०१९ च्या कॅलेंडर वर्षात १२ कसोटी सामन्यांत ५९ विकेट्स घेतल्या. २०१९मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्यानं सहकारी नॅथन लियॉनला ( ४५) दुसऱ्या स्थानावर टाकले. २०१७च्या आयपीएलमध्ये बेन स्टोक्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघानं १४.५ कोटींत घेतलं होतं.

Read in English