IPL 2021वर कोरोनाचं सावट; KKRचा धाकड फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; गोव्यात सुट्टी पूर्ण करून झालेला संघात दाखल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरूवात व्हायला ८ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पहिला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर आला आहे. Nitish Rana has been tested positive for COVID19

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरूवात व्हायला ८ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पहिला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर आला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) प्रमुख खेळाडू नितीश राणा ( Nitish Rana) याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणा गोव्यात सुट्टीसाठी गेला होता आणि तेथून तो KKRच्या ताफ्यात दाखल झाला. दोन दिवसांपूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु, BCCI व KKR यांच्याकडून या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नितीश मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाला आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आयपीएलचे १४वे पर्व ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होईल. कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.

नितीश राणानं २०२०च्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांत २५४ धावा कुटल्या होत्या. त्यानं आतापर्यंत आयपीएलच्या ६० सामन्यांत १४३७ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट हा १३५.५६ इतका आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत नितीशनं ७ सामन्यांत ६६.३३च्या सरासरीनं ३९८ धावा चोपल्या. त्यात एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता.

KKR चे सर्व खेळाडू ताफ्यात दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. शुबमन गिल, कमलेश नागरकोटी व शिवम मावी यांचे सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आंद्रे रसेल, कर्णधार इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक व सुनील नरीन हेही सराव करताना दिसत आहेत.

या स्पर्धेत बबल-टू-बबल असे ट्रान्स्फर असणार आहे. ( bubble-to-bubble transfers). याचा अर्ध एखादा खेळाडू किंवा कोचिंग स्टाफचा सदस्य आंतरराष्ट्रीय मॅचमधूल आल्यास तो आयपीएल बायो-बबलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच दाखल होऊ शकतो. पण, ते खेळाडू किंवा स्टाफ चार्टर्ड विमान किंवा प्रायव्हेट कारनं येत असेल तरच त्याला आयपीएल बायो-बबलमध्ये येता येईल.

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - रिटेन खेळाडू : शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी;

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- शकिब अल हसन ( Shakib Al Hasan) ३.२० कोटी, शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) २० लाख, वैभव अरोरा ( Vaibhav Arora) २० लाख, करुण नायर ( Karun Nair) ५० लाख, हरभजन सिंग ( Harbhajan Singh) २ कोटी, बेन कटींग ( Ben Cutting) ७५ लाख, वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) २० लाख, पवन नेगी ( Pawan Negi) ५० लाख.