ICC World Test Championship Points Table 2025-27 : न्यूझीलंडच्या संघाने वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्हच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला ९ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंड संघाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या संघाने WTC स्पर्धेतील विजयाचं खाते उघडताच भारतीय संघाचे गुणतालिकेत गणित बिघडलं आहे. इथं एक नजर टाकुयात न्यूझीलंडच्या विजयानंतर WTC च्या गुणतालिकेत भारतीय संघाला कसा फटका बसला? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडची उंच उडी; टीम इंडियाला बसला फटका
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्या हंगामात टीम इंडियाला पराभवाचा दणका देणाऱ्या न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या चक्राची सुरुवात केली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यावर न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. या निकालानंतर एक विजय आणि एक अनिर्णित सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ ६६.६७ विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. श्रीलंकन संघाची विजयी टक्केवारी न्यूझीलंडच्या बरोबरीनं असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
भारतीय संघ घाट्यात, पाकिस्तानही एक पाऊल पुढे
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याच्या निकालाचा टीम इंडियासह पाकिस्तानलाही फटका बसला आहे. पण भारतीय संघापेक्षा पाकिस्तान भारी ठरल्याचे दिसते. टीम इंडिया पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहचली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले असून यातील ४ विजय ४ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह भारताची विजयाची टक्केवारी ४८.१५ इतकी आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघाची विजयी टक्केवारी ५० असून ते भारतीय संघाचे किंचित पुढे असल्याचे दिसून येते.
आघाडीच्या दोन जागेवर ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेचा कब्जा
WTC 2025-27 च्या नव्या सर्कलमध्ये ऑस्ट्रेलियनं संघ सर्वात आघाडीवर आहे. आतापर्यंत ५ कसोटी सामन्यातील सर्वच्या सर्व सामने जिंकत त्यांनी १०० टक्के कामगिरीसह अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघाची विजयाची टक्केवारी ७५ इतकी असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत.