काय चेंडू टाकला राव... डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आधी बेल्स उडाल्या, Video

Eng vs Aus, 3rd ODI : तीन सामन्यांत वॉर्नरला 36 धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:01 PM2020-09-16T23:01:00+5:302020-09-16T23:01:21+5:30

whatsapp join usJoin us
Eng vs Aus, 3rd ODI : What a ball from...Joe Root;  Joe Root bowls David Warner with a ripper, Watch Video | काय चेंडू टाकला राव... डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आधी बेल्स उडाल्या, Video

काय चेंडू टाकला राव... डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आधी बेल्स उडाल्या, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जेसन रॉय आणि जो रूट यांना पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर इंग्लंडचा डाव कोसळेल असे वाटत होते. पण, मधळ्या फळीनं दमदार कामगिरी करून इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु बराच वेळ खेळपट्टीवर टीकूनही त्याला अपयशाची मालिका खंडित करता आली नाही. इंग्लंडच्या जो रुटनं भारी चेंडू टाकून त्याचा त्रिफळा उडवला. 

विराटच्या संघातील नव्या खेळाडूनं इंग्लंड दौरा गाजवला; कुणालाच न जमलेला विक्रम केला

प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्या दोन चेंडूंत दोन धक्के बसले. रॉयला झेलबाद करून माघारी पाठवल्यानंतर एका अप्रतिम चेंडूवर स्टार्कनं रूटला पायचीत केलं. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. अॅडम झम्पानं इंग्लंडच्या कर्णधाराला बाद केले. त्यापाठोपाठ आलेला जोस बटलरही लगेच माघारी परतला. पण, त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. बेअरस्टो आणि सॅम बिलिंग यांनी 114 धावांची भागीदारी करताना संघाला मोठ्या आघाडीच्या दृष्टीनं वाटचाल करून दिली.  बेअरस्टोने 126 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारासह 112 धावा केल्या. सॅम बिलिंगनेही 57 धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीनंतर ख्रिस वोक्सनं 39 चेंडूंत 6 चौकारांसह 53 धावा चोपल्या. इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या.


लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस वोक्सनं ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज अॅरोन फिंच आणि मार्कस स्टॉयनिस यांना बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लाबुशेनसह खिंड लढवली. पण, जो रूटच्या अप्रतिम चेंडूंनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ रूटनं मिचेल मार्शलाही बाद केलं. ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज 55 धावांत  माघारी परतले होते.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना  

चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार 

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो  

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण 

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

Web Title: Eng vs Aus, 3rd ODI : What a ball from...Joe Root;  Joe Root bowls David Warner with a ripper, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.